आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uma Bharati Comment On Robert Vadra News In Marathi

भाजपचे सरकार सत्तेत आले तर रॉबर्ट वढेरा तुरुंगात जातील -उमा भारती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झाशी- भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले तर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावाई आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा तुरुंगात जातील, असे भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी म्हटले आहे. वढेरा अनेक गैरव्यवहारांमध्ये अडकलेले आहेत, असा दावाही उमा भारती यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना उमा भारती म्हणाल्या, की रॉबर्ट वढेरा यांचा अनेक गैरव्यवहारांमध्ये सहभाग आहे. त्यांची चौकशी केली तर सत्य उघडकीस येईल. भाजपचे सरकार आले तर वढेरा तुरुंगात जातील.
यावेळी समाजवादी पक्षावर हल्ला करताना उमा भारती म्हणाल्या, की पोलिस बळाचा गैरवापर करून उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकण्याचा समाजवादी पक्ष प्रयत्न करीत आहे. या पक्षाने काही पोलिसांना मुद्दाम बढत्या दिलेल्या आहेत. आता हे पोलिस अधिकारी समाजवादी पक्षाला मदत करीत आहेत.