आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फायरब्रांड नेत्या उमा भारती गरजल्या, "मै मेरी झांसी नही दुंगी!!!"

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना रायबरेली येथून आव्हान देणार नसल्याचे भाजपच्या फायरब्रांड नेत्या उमा भारती यांनी स्पष्ट केले आहे.
सोनिया गांधी यांच्याविरुद्ध उमा भारती निवडणूक लढणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तूळात चर्चा रंगली होती. परंतु, आता उमा भारती यांनी स्पष्टीकरण दिल्याने आता चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
बाबा रामदेव यांनी या चर्चेत तेल ओतले होते. त्यांनी उमा भारती यांनी रायबरेलीतून निवडणूक लढावी, असा सुचक सल्लाच देऊन टाकला होता. उमा भारती यांनी ही निवडणूक लढली तर मी घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार करेन, असेही ते म्हणाले होते.
झांसी येथून उमा भारती यांच्या उमेदवारीची आधीच घोषणा करण्यात आली आहे. सोनिया गांधी यांना आव्हान देण्यासंदर्भात त्या म्हणाल्या, की मी आधीच राजनाथसिंह यांना सांगितले आहे, की मी झांसी सोडणार नाही.
उमा भारती यांनी रायबरेली येथून निवडणूक लढू नये असाही एक प्रवाह भाजपमध्ये आहे. उमा भारती यांनी बुंदेलखंडमधील झांसी येथे जोरदार प्रचार केला तर त्याचा लाभ जवळच्या मतदारसंघांना होणार असल्याचे सांगितले जात आहे. रायबरेलीतून त्यांना उमेदवारी दिली तर त्याचा फटका काही मतदारसंघांना बसण्याची शक्यता आहे.