Home | National | Other State | Uma Bharati said that Priyanka Gandhi known as thieves wife

देश प्रियंकाला 'चोराची पत्नी' म्हणून ओळखतो, प्रचारात त्यांचा काहीच प्रभाव पडत नाही - उमा भारती

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 17, 2019, 12:25 PM IST

पतीवर चोरीचा आरोप असणाऱ्याचा जनतेवर काय परिणाम होणार?

  • Uma Bharati said that Priyanka Gandhi known as thieves wife

    रायपूर - देश प्रियंका गांधी वढेरा यांना एका चोराची (रॉबर्ट वढेरा) पत्नी म्हणूनच ओळखतो. लोकसभा निवडणुकीत त्या उत्तरप्रदेशच्या जनेतवर कोणताही प्रभाव पाडू शकणार नाहीत. जिच्या पतीवर चोरीचा आरोप आहे, तिचा जनतेवर काय प्रभाव पडणार? अशी खोचक टीका केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केली. प्रियंकाच्या वाराणसी लोकसभा निवडणूक लढविण्याचा प्रश्नावर छत्तीसगडमधील दुर्ग येथे त्या बोलत होत्या.

    ही तर राहुल गांधी यांच्या पराभूताची चिन्हे
    पुढे बोलतांना उमा म्हणाल्या की, ही लोकशाही आहे. कोणी कोठूनही निवडणूक लढवू शकतो. राहुल गांधीवर निशाणा साधत म्हणाल्या की, ते काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकतात. त्यांचे अमेठी आणि वायनाड येथून निवडणूक लढवणे हे त्यांची हार झाल्याची चिन्ह असल्याचे दर्शवत आहे.

Trending