आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमा भारती म्हणाल्या, आम्ही जिवंत आहोत तोवर कोणीही आरएसएसवर बॅन लावू शकणार नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - मध्यप्रदेशात सध्या निवडणुकीमुळे वातावरण तापले आहे. काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS)च्या शाखांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या जाण्यावर बॅन लावण्याचे आश्वासन दिले आहे. त्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी याबाबत बोलताना म्हणले की, आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत संघावर बॅन लावता येणार नाही. 


काय म्हणाल्या उमा भारती 
यावेळी उमा भारती म्हणाल्या संघ ही एक राष्ट्रवादी विचारप्रणाली आहे. ती सर्वांच्या मनात आहे. त्यामुळेच संघ कधीही कार्यकर्त्यांची अधिकृत नोंदणी करत नाही. जोपर्यंत आम्ही जीवंत आहोत, संघ आमच्यामध्ये जिवंत राहील. राहुल गांधी हे गांभीर्याचा अभाव असलेले नेते असल्याचेही उमा भारती म्हणाल्या. 


काँग्रेसने मध्यप्रदेशच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात म्हटले की, त्यांची सत्ता आल्यास सरकारी कार्यालये आणि परिसरात RSS च्या शाखा भरवू देणार नाही. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना आरएसएसच्या शाखांमध्ये जाण्याची परवानगी देणारा निर्णयही पक्ष मागे घेईल असेही काँग्रेसने म्हटले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...