आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएन्टटेन्मेंट डेस्क. जोधपुरच्या ज्या उमैद भवनमध्ये प्रियांका चोप्राचे लग्न होत आहे, त्याच्या एका भागात म्हणजेच पॅलेस एरियामधील म्यूझियम 5 दिवस बंद करण्यात आले आहे. मॅनेजमेंटने एक बोर्ड लावून ही सूचना दिली. त्यांनी लिहिले की, म्यूझियमला 29 नोव्हेंबरपासून 3 डिसेंबरपर्यंत डाग-डूजीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येईल. पण ही सूचना खोटी असल्याचे लोक म्हणत आहेत. सोशल मीडिया यूजर्स आपला राग व्यक्त करत आहे. एकाने कमेंट करुन लिहिले की, 'आम्हा जोधपुरवाल्यांना बावळट समजले आहे का?' दूस-या यूजरने विचारले - खोटे का बोलता, लग्न आहे हे सरळ सांगा ना...
29 पासून सुरु होणार लग्नाचे फंक्शन
- प्रियांका चोप्राने आपल्यापेक्षा 10 वर्षे लहान अमेरिकी सिंगर निक जोनाससोबत विवाह बंधनात अडकणार आहे. दोघांचे लग्न हिंदू आणि क्रिश्चियन पध्दतीने होणार आहे.
- लग्नाचे फंक्शन 29 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे आणि 3 डिसेंबरपर्यंत सुरु राहतील. 29 ला प्रियांकाची संगीत आणि मेंदी सेरेमनी होईल. 30 ला कॉकटेल पार्टी, 1 तारखेला हळदी सेरेमनी होईल. 2 डिसेंबरला प्रियांका-निक हिंदू आणि 3 तारखेला क्रिश्चियन पध्दतीने लग्न करतील.
सजवण्यात येत आहे भवन पॅलेस
उमैद भवन पॅलेस तीन भागांमध्ये विभागले गेले आहे. एका भागात रॉयल फॅमिली राहते, दूस-या भागात लग्जरी ताज पॅलेस हॉटेल आहे आणि भागात म्यूझियम आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.