आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्पोर्ट डेस्क- पाकिस्तानचा विकेटकीपर उमर अकमल परत एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ईएसपीएन क्रिइंफोच्या रिपोर्टनुसार पाकिस्तानच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये झालेल्या फिटनेट टेस्टमध्ये फेल झाल्यानंतर उमरने ट्रेनरसमोर आपले सर्व कपडे काढले. त्यानंतर ट्रेनरला विचारले, "पाहा माझ्या शरिरावर कुठे चरबी दिसत आहे का." या घटनेनंतर ट्रेनरने पीसीबीकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे. यानंतर आता पीसीबी अकमलवर पुढील सीरिज खेळण्याचा बॅन लावू शकते.
ही घटना अशा वेळेस झाली आहे, जेव्हा कोच मिस्बाह उल हकच्या नेतृत्वात पीसीबी फिटनेसवर सर्वाधिक भर देत आहे. बोर्डाने स्पष्ट केले आहे की, आंतरराष्ट्रीय आणि डोमेस्टीक क्रिकेटमध्येही खेळाडूंच्या फिटनेसवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
उमरला 2017 मध्ये चँम्पियंस ट्रॉफीतून परत पाठवले होते
ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा खराब व्यवहारामुळे उमर चर्चेत आला नाही. यापूर्वी 2017 मध्ये त्याला इंग्लँडमध्ये झालेल्या चँपियंस ट्रॉफीमधून परत आपल्या देशात पाठवले होते. तेव्हा तत्कालीन कोच मिकी आर्थरने फिटनेस टेस्टमध्ये फेल झाल्यानंतर अकमलवर कारवाई केली होती. दुसरीकडे, उमरचा मोठा भाऊ कामरान आणि माजी कर्णधार सलमान बट्टदेखील टेस्टमध्ये फेल झाले आहेत. रिपोर्टनुसार कामरानने दोन वेळेस फिटनेस टेस्टला सोडले. 11 जानेवारीला पीसीबीने त्याला बोलवले होते, पण तो गेलाच नाही. त्याला 20 जानेवारीला परत बोलवले पण तो आजारी असल्याचा बहाना करुन टेस्ट देण्यासाठी गेलाच नाही. शेवटी 28 जानेवारीला त्याची फिटनेस टेस्ट झाली, तिथे तो फेल झाला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.