आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीर स्थितीवर यूएनचा अहवाल, भारताने नोंदवला आक्षेप; अहवाल खोटा, दहशतवादाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र जम्मूच्या बेस कॅम्पचे आहे. सोमवारी फुटीरवाद्यांनी बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे अमरनाथची यात्रा रोखण्यात आली होती. - Divya Marathi
छायाचित्र जम्मूच्या बेस कॅम्पचे आहे. सोमवारी फुटीरवाद्यांनी बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे अमरनाथची यात्रा रोखण्यात आली होती.

नवी दिल्ली - भारताने सोमवारी जम्मू-काश्मीरच्या स्थितीवर जारी अहवालावरून संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त कार्यालयावर टीका केली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीशकुमार म्हणाले की,काश्मीरच्या स्थितीवरील हा अहवाल खोटा आणि दुर्भावनेवर आधारित आहे. त्यात पाकसमर्थित दहशतवादाच्या मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्याआधी यूएनच्या अहवालात म्हटले आहे की, भारत आणि पाक काश्मीरमधील स्थिती सुधारण्यात अपयशी ठरले, मागील अहवालात व्यक्त केलेली चिंता दूर करण्यासाठी दोन्ही देशांनी ठोस पावले उचलली नाहीत. कुमार म्हणाले की, या अहवालातील बाबी देशाच्या सार्वभौमत्वाचे हनन करतात.

 

बुरहान वानीचा स्मृतिदिन, काश्मीर खोऱ्यात बंद
श्रीनगर - खोऱ्यात सोमवारी दहशतवादी बुरहान वानीच्या स्मृतिदिना फुटीरवाद्यांनी बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे पूर्ण खोऱ्यात कामकाज ठप्प राहिले. खबरदारी म्हणून प्रशासनाने सुरक्षेचे कडक उपाय योजले होते. दक्षिण काश्मीरमध्ये मोबाइल-इंटरनेटही बंद केले होते. हिजबुल मुजाहिदीन काश्मिरात आपल्या दहशतवादी अजेंड्यासाठी बुरहानचा वापर पोस्टर बॉयप्रमाणे करत होती. तीन वर्षांपूर्वी ८ जुलैला बुरहान सुरक्षा दलांकडून ठार झाला होता.