UN / काश्मीरवर भारत-पाक म्हणतील तेव्हाच हस्तक्षेप- यूएन; अमेरिका म्हणे, आम्ही परिस्थिती नजर ठेवून आहोत

काश्मीरावर भारताच्या ऐतिहासिक निर्णयावर यूएनची प्रतिक्रिया

दिव्य मराठी वेब

Aug 06,2019 11:09:00 AM IST

वॉशिंगटन - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी अध्यादेश जारी करून जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले. यावर पाकिस्तानकडून नकारात्मक प्रतिक्रिया सुरू झाल्या. तसेच पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर आंतरराष्ट्रीय समुदायात दाद मागण्याची धमकी दिली. परंतु, संयुक्त राष्ट्रने यावर कुठल्याही प्रकारची मध्यस्थी करण्यास नकार दिला आहे. संयुक्त राष्ट्र प्रमुख अॅण्टोनियो गुटेरस यांनी सांगितल्याप्रमाणे, भारत आणि पाकिस्तान दोघेही मध्यस्थीसाठी म्हणतील तेव्हाच काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप केला जाईल. सोबतच, दोन्ही पक्षांना संयम बाळगण्याचा सल्ला देखील यूएनने दिला आहे.


यूएन प्रमुख अॅण्टोनियो गुटेरस यांचे प्रवक्ते स्टीव्हन दुजॅरिक सोमवारी पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना भारत आणि पाकिस्तानच्या काश्मीरप्रश्नावर प्रतिक्रिया मागण्यात आली. तेव्हा दोन्ही देश मध्यस्थी करण्यास सांगतील तेव्हाच काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्र दखल देणार असे ते म्हणाले आहेत. यासोबतच, अमेरिकेने सुद्धा पाकिस्तानच्या आवाहनास दुर्लक्ष केले. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, भारताने घेतलेल्या काश्मीर संदर्भातील निर्णयावर अमेरिका नजर ठेवून आहे. हा दोन्ही देशांचा अंतर्गत मुद्दा असून त्यांनी शांततेने सोडवावा असेही अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

X
COMMENT