आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Unauthorized Party At Corp orator\'s Farmhouse In Jalgoan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थर्टीफर्स्टला सहा ललना नाचवलेले फार्महाऊस जळगावचे माजी महापौर ललित कोल्हेंच्या मालकीचे; दावा रजिस्टर्ड साैदेपावतीचा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- थर्टीफर्स्टच्या रात्री ममुराबाद शिवारात असलेल्या शेतातील फार्महाऊसमध्ये बऱ्हाणपूर येथून सहा तरुणी बोलावून त्यांच्यासोबत धांगडधिंगा, गैरवर्तन सुरू होते. याचवेळी पोलिसांनी छापा मारून २४ जणांना ताब्यात घेतले. दरम्यान, हे शेत व फार्महाऊस माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीचे आहे. परंतु, दीड वर्षांपूर्वीच सौदापावती तयार करून आपण ते राजेश मुंदडा यांच्या नावे केल्याचा दावा कोल्हे यांनी केला आहे. तर हे शेत, फार्महाऊस आपल्या नावे नसून भाडेतत्त्वाचे अॅग्रीमेंट आहे, असे उत्तर मुंदडा यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिले आहे. 

 

पोलिसांनी राजकीय दबावापोटी या प्रकरणात त्रुटी ठेऊन केवळ प्रतिबंधात्मक कारवाई केली. परंतु, शेत, फार्महाऊस मालकावर गुन्हा दाखल केला नाही. प्रतिबंधात्मक कारवाईदेखील केली नाही. पोलिस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी पथकासह या डान्स पार्टीवर छापा मारला होता. यात हायप्रोफाइल लोकांचा सहभाग असल्यामुळे मंगळवारी दिवसभर नाट्यमय घडामोडी घडल्या. राजकीय दबाव आल्यामुळे पोलिसांनी दोन वेळा कारवाईत आला. 

 

दर महिन्याला डान्स पार्टी अन‌् जुगाराच्या अड्ड्यावर जाेडीदारांची बडदास्त 
जळगाव शहरात तसेच नजीकच्या शेतांमध्ये बडे पुढारी, व्यावसायिकांचा जुगार अड्डा रंगलेला असतो. दररोज लाखो रुपयांची उधळण यातून होत असते. याच जुगार अड्ड्याशी निगडीत लोकांसाठी ही डान्स पार्टी दरमहिन्याला आयोजित केली जात असते. त्यांची चांगलीच बडदास्त ठेवली जाते. गेल्या वर्षी झालेल्या पार्टीत एका राजकीय पुढाऱ्याच्या मुलाने डान्स पार्टीत येऊन स्वत:च्या बापाला झापून काढले होते. त्यामुळे ही डान्स पार्टी काही नवीन नसल्याची माहिती समोर आली आहे. गैरकृत्य करण्यासाठी ही प्रॉपर्टी देखील अधांतरीत ठेवण्यात आली आहे. तिचा मालक कोण याचादेखील योग्य उलगडा होऊ दिला जात नाही. अशी खात्रीलायक माहिती बुधवारी समोर आली. यंदा पहिल्यांदाच पोलिसांनी या डान्स पार्टीवर छापा मारण्याची हिंमत केली. त्यामुळे संपूर्ण राज्यात ही 'रंगेल पार्टी' चर्चेत आली आहे. 

 

'त्या' मालमत्तेची दीड वर्षांपूर्वीच साैदापावती केली 
संबंधित शेत, फार्महाऊस हे दीड वर्षांपूर्वीच कच्ची सौदापावती करून राजेश मुंदडा यांच्या नावे केले आहे. आता त्या मालमत्तेशी आपला काही एक संबंध नाही. मालमत्ता ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी तेथे काय करावे हा अधिकार त्यांचा आहे. - ललित कोल्हे, माजी महापौर 

 

ममुराबाद रस्त्यावरील ती मालमत्ता भाडेकराराची 
माझ्या सोबत काय करार झाला आहे ते माहित नाही, पहावे लागेल. भाडेतत्त्वावर मालमत्ता घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या त्या कारवाईमुळे आपले मानसिक स्वास्थ खराब आहे. थर्टीफर्स्टच्या त्या पार्टीचे आयोजन मी केलेले नव्हते. - राजेश मुंदडा, जळगाव 

 

पाेलिस अधिकारी म्हणाले, तपास संपला आता काय करणार? 
शेत किंवा फार्महाऊस कोणाच्या नावावर आहे, याची माहिती पोलिसांनी दोन दिवसांपासून दडवून ठेवली. पुढील तपासात ही माहिती समोर येईल, अशी उत्तरे पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे, पोलिस उपअधीक्षक डॉ. रोहन, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांनी दिले. परंतु, आता मुंबई पोलिस कायदा कलम ११०, ११७ नुसार दंडात्मक कारवाई पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुढील तपास करण्याची काही एक गरज भासणारच नाही. म्हणजेच शेतमालक, फार्महाऊस मालक, डान्स पार्टीचा आयोजक यांना अलगदपणे कारवाईतून वगळण्यात आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. 

 

काेल्हे दाेषी असतील तर त्यांच्यावर पाेलिसांनी थेट कारवाई करावी 
ललनांसाेबत डान्स पार्टी रंगलेले शेत, फार्म हाऊस माजी महापाैर ललित काेल्हे यांच्या मालकीचे आहे. ते जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व आमदार सुरेश भाेळे यांच्या जवळचे असल्याने पाेलिसांनी कारवाई टाळण्यासाठी दबाव आणल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री महाजनांशी संवाद साधला असता 'ललित काेल्हे दाेषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करावी,' अशी भूमिका त्यांनी मांडली. 

 

एसपी शिस्तीचे भाेक्ते, दबाव कसा आणू 
जळगावात ३१ डिसेंबरला फार्महाऊसवर डान्सबार सुरू असल्याची माहिती मिळाली. ते फार्महाऊस ललित काेल्हेंचे असल्याचे कळाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क केला. परंतु काेल्हेंनी दाेन एकर जागा भाड्याने दिली असून त्याची साैदापावती केली असून दर महिन्याला भाडे घेतले जाते. त्यामुळे पाेलिसांवर मी दबाव आणण्याचा काेणताही संबंध नाही. पाेलिस अधीक्षक शिंदे कडक प्रशासक आहेत. त्यांनी रितसर कारवाई करायला हवी. यात जाे काेणी दाेषी असेल त्यांच्यावर कारवाई करावी मग ललित काेल्हे का असेना. गिरीश महाजन, जलसंपदामंत्री, महाराष्ट्र राज्य 

 

दबाव टाकणारा ताे मंत्री मी नव्हे 
पाेलिसांनी फार्महाऊसवर छापा टाकल्यामुळे त्यांना सर्व काही माहिती आहे. त्यामुळे मी दबाव आणण्याचा संबंध नाही. अधीक्षक शिंदे हे कर्तव्यदक्ष अधिकारी असून उपअधीक्षक डाॅ. नीलभ राेहन हे नावाजलेले अधिकारी आहेत. एसपी शिंदे कठाेर भूमिका घेतात. परंतु, या प्रकरणात त्यांची कुठेही प्रतिक्रिया आलेली नाही हे विशेष. एकीकडे माजी नगरसेवकावर गाेळीबार हाेताे तर दुसरीकडे बारबाला आणून नाचवले जाते हे काय चाललय. पाेलिसांनी दबावाखाली काम करू नये. राजकीय दबाव आणणारा ताे मंत्री मी नाहीच. गुलाबराव पाटील, सहकार राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य