आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिनहेड्स पिझ्झाचे अनाेखे चॅलेंज; 32 मिनिटांत 32 इंच पिझ्झा खा, 2 मिल्कशेक प्या अन‌् 500 युराे जिंका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डब्लिन - अायर्लंडची राजधानी डब्लिनच्या प्रसिद्ध पिनहेड‌्स पिझ्झाने तीन वर्षांपासून पिझ्झाप्रेमींसाठी अापली अावडती डिश खाण्यासाेबतच पैसे कमावण्याची संधी उपलब्ध करून दिली अाहे. जाे काेणी या ठिकाणी येेऊन ३२ इंच पिझ्झा व दाेन मिल्कशेक ३२ मिनिटांत खाईल त्याला ५०० युराे म्हणजे ४०,८०० रुपये मिळतील. पिनहे‌ड‌्स पिझ्झाचे मालक अँथाेनी कॅली यांनी २०१५ मध्ये हे चॅलेज सुरू केले. तेव्हा पिझ्झा खाणाऱ्याला ५० युराेचे बक्षीस व एक पिझ्झा फ्री मिळत असे. तेव्हापासून हे चॅलेंज अाजपर्यंत काेणीही पूर्ण करू शकलेले नाही. त्यामुळे अँथाेनी यांनी बक्षिसाची रक्कम ५०० युराे केली. अँथाेनी यांनी हे अायर्लंडचे सर्वात माेठे चॅलेंज जाहीर केले हाेते, अाता ते द नोटोरियस पिझ्झा नावाने अाेळखले जाते. 


एकच जण अर्धा पिझ्झा खाऊ शकला :  अँथाेनी यांच्या मते, अातापर्यंत १०० लाेक या स्पर्धेसाठी प्रयत्न करून पाहिला, मात्र अयशस्वी ठरले. मला विश्वास अाहे की ३२ मिनिटांचे चॅलेंज काेणीही पूर्ण करू शकणार नाही, मात्र तरीही मी स्पर्धेसाठी अामंत्रित करत असताे. स्टॅग सर्व्हेस फूड चॅॅलेजचे राॅब यांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला, मात्र ३२ मिनिटांत ते केवळ अर्धाच पिझ्झा संपवू शकले. अातापर्यंत जे लाेक या स्पर्धेत सहभागी हाेऊ शकले, तेही सांगतात की केवळ अर्ध्या तासात हा पिझ्झा संपवणे केवळ अशक्यच अाहे. 

बातम्या आणखी आहेत...