आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना- भाजपचा वाद मिटत नसेल तर ईशान्य-मुंबईमधून रामदास आठवलेंना उमेदवारी द्या- रिपाइंची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजप यांचे एकमत होत नाही. या मतदारसंघात सेना भाजपमध्ये टोकाचे वाद आहेत. हा वाद मिटविण्यासाठी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासाठी सोडावा, अशी  आग्रही मागणी शुक्रवारी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर आणि मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केली आहे. मुंबईत आझाद मैदान येथील रिपाइं च्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली.

 

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजप ने मन मोठे करून रिपब्लिकन पक्षासाठी सोडल्यास संपूर्ण देशभरात चांगला संदेश जाईल. ईशान्य मुंबईत शिवसेनेचा किरीट सोमैय्या यांना तीव्र विरोध आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण हे अजून स्पष्ट झालेले नाही.त्यामुळे या  मतदारसंघात संभ्रम निर्माण झाला आहे.  ईशान्य मुंबईत शिवसेना भाजपचा  सुरू असलेला टोकाचा वाद मिटवायचा असेल तर ही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात
यावी, अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे.

 

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सुटल्यास या मतदारसंघात रामदास आठवले हे निवडणूक लढतील त्याबाबत त्यांची तयारी असल्याचे अविनाश महातेकर आणि गौतम सोनवणे यांनी स्पष्ट केले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराबाबत चर्चा केली असून  भाजप शिवसेना आरपीआय महायुतीच्या प्रचाराला रिपब्लिकन पक्षाने सुरुवात केली आहे. तरी देखील ईशान्य मुंबई हा मतदारसंघ आंबेडकरी जनतेचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातील  उमेदवारीवरून भाजप शिवसेनेत टोकाचे वाद होत आहेत. हे वाद मीटविण्यासाठी शिवसेना भाजप युतीने मन मोठे करून हा मतदारसंघ आरपीआय ला सोडावा येथे महायुती तर्फे ना रामदास आठवले निवडणूक लढवतील. त्यामुळे देशभर रिपब्लिकन जनतेत महायुतीचा चांगला संदेश  जाईल. त्यामुळे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपने रामदास आठवलेंसाठी सोडावा अशी आग्रही मागणी  अविनाश महातेकर आणि गौतम सोनवणे या नेत्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...