Home | Maharashtra | Pune | Uncle arrested in Rape Case of Specifiable girl in Pune

लज्जास्पद..घरी एकटीच होती दिव्यांग मुलगी, पुण्यात नराधम मामानेच केला भाचीवर बलात्कार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 12, 2019, 08:43 PM IST

पीडित मुलगी घरी एकटी होती. याचा फायदा घेऊन आरोपीने मुलीवर अत्याचार केला.

  • Uncle arrested in Rape Case of Specifiable girl in Pune

    पुणे- चाकणमध्ये एका दिव्यांग अल्पवयीन मुलीवर तिच्या मामानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

    मिळालेली माहिती अशी की, चाकणमध्ये 7 जानेवारीला ही घटना घडली. पीडित मुलीची आई मोलमजुरी करते. ती कामासाठी गेली होती. पीडित मुलगी घरी एकटी होती. याचा फायदा घेऊन आरोपीने मुलीवर अत्याचार केला. एवढेच नाही तर तिला याबाबत कुठे वाच्यता करायची नाही, असा दमही दिला.

    आई घरी आल्यानंतर पीडित मुलीने आपबिती सांगितली. आईने पीडितेला सोबत घेऊन थेट पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी आरोपी मामाला अटक केली आहे.

Trending