आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2 लाख रूपयांसाठी काकानेच पुतणीला विकले, अनेकवेळा झाला बलात्कार...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणा- येथील एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला 2 लाख रूपयांत विकण्यात आले. तेथे तिला 2 महिने बंदू बनवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. मुलीने कसेबसे तेथून पळ काढला आणि पोलिसांकडे मदत मागितली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी युवकावर आत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

 

घटना हरियाणाच्या भिवाडीची आहे. येथील एका मुलीला 2 लाखांसाठी विकण्यात आले. त्यानंतर त्या नराधमाच्या तावडीतून सुटण्यासाठी मुलीने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली, यात ती जखमी झाली. त्यानंतर एका शेजाऱ्याच्या मदतीने पोलिसांत घटनेची माहिती दिली.

 

भिवाडी पोलिस ठाण्याच्या एसएचओ नन्ही देवी यांनी सांगितले की, मुलीचे काका तिला हरियाणाला घेऊन आले होते. त्यांनी सांगितले की, येथे एक मुलगा पाहायचा आहे आणि तिला 2 लाख रूपयांसाठी मुलीला आरोपी संदीप आणि त्याची शकुंतला यांना विकले. आरोपीने बळजबरीने मुलीसोबत लग्न केले आणि त्यानंतर तिला बंदी बनवून तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला.

 

मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संदीप आणि त्याच्या आईला अटक केले आहे. दोघांवर पोस्को कलमा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. त्यासोबत पोलिस मुलीच्या काकाचा शोध घेत आहेत.