आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूस विक्रीच्या किरकोळ वादातून पुतण्याने केला काकाचा खून, आरोपी फरार, भोकरदन तालुक्यातील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन- कापूस खरेदी-विक्रीच्या किरकोळ वादातून पुतण्याने काकाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपी मासुम पठाण याने त्याचे काका युनूस पठाण यांच्या पोटात चाकू भोसकून हत्या केली. तालुक्यातील बाभूळगाव येथे शुक्रवारी रात्री ही घटना घडली. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

 

मिळालेली माहिती अशी की, आरोपी मासूम पठाण व त्याचा भाऊ सलीम पठाण या दोघांचे कापूस-विक्रीच्या वादातून शुक्रवारी संध्याकाळी कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर आरोपीने काका युनूस पठाण यांच्या घरासमोर येऊन 'तुमचा सर्वांचा मुडदा पाडतो, अशा शब्दात धमकी दिली. आरोपीच्या हातात चाकू होता. आरोपी शिवीगाळ करत असताना मशिदीतून नमाझ पठण करून युनूस पठाण हे घरी आले. ते आरोपीला समजावण्यासाठी पुढे गेले असता आरोपीने त्यांच्याशी हुज्जत घातली. ते समजून काढण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी पुतण्याने त्यांच्या पोटात चाकू भोसकला.

 

गंभीर जखमी झालेल्या युनूस पठाण यांना तात्काळ भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात हल‍वण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले. परंतु, रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

 

भोकरदन पोलिसांना घटनेची माहिती समजताच डीवायएसपी सुनील जायभाये, पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी व सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमन शिरसाट, जमादार रुस्तुम जैवळ, अभिजित वायकोस हे करीत आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा..संबंधित घटनेचे फोटो...

 

 

बातम्या आणखी आहेत...