आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडाळ्याजवळ ट्रकच्या धडकेत 5 बाइकस्वारांचा मृत्यू, ट्रक पलटी झाल्याने ड्रायवर गंभीर जखमी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक अनियंत्रित झाला

पुणे- मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर खंडाळ्याजवळ काल(रविवार) मध्यरात्री वेगाने येणाऱ्या ट्रकने 3 बाइक्सला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बाइकवरील 5 जणांचा मृत्यू झाला. ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रकही अनिंत्रित होऊन पलटला आणि ड्रायवरदेखील गंभीर जखमी झाला आहे.


मृतांमध्ये प्रदीप चोरले, अमोल चिमले, नारायण गुंडाळे, निवृत्ती गुंडाळे आणि गोविंद नलवाड आहेत. याशिवाय ट्रक ड्राइवर बालाजी हरिश्चंद्र भंडारीदेखील गंभीर जखमी आहे.


ट्रक पुण्यावरुन मुंबईकडे जात होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि बचावकार्य सुरू केले. अपघातामुळे 2 तास एक्सप्रेस-वे जाम झाला होता. जखमी ड्रायवहरला खंडाळ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

बातम्या आणखी आहेत...