आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपारंपरिक आव्हाने ही महिलांसाठी संधी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

साधना शंकर, भारतीय महसूल सेवा अधिकारी
काही महिन्यांपूर्वी फिनलंडमध्ये चार पक्षांच्या आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले आहे. चार पक्षांच्या प्रमुख महिला असलेले हे इतिहासातील कदाचित पहिले आघाडी सरकार असावे. सना मरीन पंतप्रधान आहेत. शाळेतील एक मुलगी ग्रेटा थनबर्ग जगभरात पर्यावरण वाचवण्यासाठी आंदोलन करत आहे आणि तिला ‘टाइम’ने ‘पर्सन आॅफ द इयर २०१९’ घोषित केले आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने लष्करात महिलांना परमनंट कमिशन आणि कमांड पोस्ट देण्याचा निकाल देऊन लैंगिक समानता भक्कम केली आहे. ८ मार्च २०२० रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिलादिनी नेतृत्वाच्या भूमिकेत महिला करत असलेल्या प्रगतीचा आनंदोत्सव साजरा करायला हवा, त्याचबरोबर ही वेळ चिंतनाचीही आहे.

सध्या जगातील जवळपास २२ देशांच्या प्रमुख महिला आहेत. जगात नेतृत्वपदावर बोलिव्हिया ते न्यूझीलंड, नामिबिया ते नाॅर्वे आणि जर्मनी ते ग्रीस या देशांत महिला आहेत. जवळपास १२ टक्के जगावर महिलांचे शासन आहे आणि ही टक्केवारी वाढतच जाईल.  

हवामान बदल नि:संशय सर्वात जास्त भयावह आणि व्यापक आहेत. डेटावर हल्ला आणि त्याचे महत्त्व, व्यवसाय आणि वाणिज्य यातील तंत्रज्ञानामार्फत व्यवधान आणि ओळखीत बदल ही एक अशी लढाई आहे, ज्याबाबत आधी कोणालाही माहिती नव्हती. या नव्या काळातील आव्हानांना मिळत असलेल्या प्रतिक्रियाही पारंपरिक आहेत. आक्रमकतेचे शतकांपासूनचे तंत्रज्ञान, ‘आम्ही आणि ते’चा नमुना बनवण्याची किंवा मग अडचणींचा इन्कार करण्याची किंवा मग दीर्घकाळ सुरू असलेली चर्चा, कायद्याचे रामबाणाप्रमाणे उत्तीर्ण होणे, बोलायचे काही आणि करायचे त्यापेक्षा वेगळे, अशा काही पारंपरिक प्रतिक्रिया पाहण्यास मिळत आहेत. 

आता विकासाची परिभाषा बदलत असल्याने ही अपारंपरिक आव्हाने महिला नेतृत्वासाठी संधी आहे, हे मुद्दे वेगळ्या दृष्टिकोनातून उपस्थित करण्याची, असे मॉडेल आणण्याची, जे जगाच्या व्यावहारिक आणि विस्तारित दृष्टिकोनाशी संबंध असणारे असावे. ते करुणेद्वारे प्रेरित असावे, आक्रमकतेद्वारे नव्हे. महिलांना पुरुषांपेक्षा उत्कृष्ट होण्याची गरज नाही. त्यांना नेतृत्वस्थानी वेगळे आणि उत्तम पर्याय निवडावे लागतील. दहशतवादावर न्यूझीलंडची प्रतिक्रिया, मॉस्कोत क्रोएशियाच्या राष्ट्रपतींचा २०१८ फिफा फुटबॉल वर्ल्डकप टीमला दिलासा देणे आणि आइसलँडचा महिला आणि पुरुषांना समान वेतनाचा कायदा लागू करणे ही याच दिशेने जाणारी काही उदाहरणे आहेत. शेतीची सुरुवात, औद्योगिक युग किंवा माहिती युग या सर्वांचे अग्रज पुरुषच राहिले आहेत. ते आता बदलाच्या बाजूने आहेत. आता जास्तीत जास्त महिला आगामी शतकात उद्योग कसे असावेत याची निर्मिती करण्यात व्यग्र आहेत. शेतीपासून अंतराळापर्यंतच्या क्षेत्रांचा त्यात समावेश आहे. महिला नेतृत्व पदांसाठी हळूहळू आपला मार्ग तयार करत आहेत. 

फॉर्च्युन ५०० कंपन्यांच्या यादीत समाविष्ट असलेल्या ३३ कंपन्यांच्या सीईओ महिला आहेत. त्यापैकी शेरिल सँडबर्ग फेसबुकच्या सीओओ आहेत, उर्सुला बर्न्स ‘वेओन’च्या अध्यक्ष आहेत, तर फेबे नोवाकोविक अमेरिकन डायनॅमिक्स या संरक्षण कंपनीच्या प्रमुख आहेत. त्या सर्व जणी भविष्यातील अपेक्षांवर नजर ठेवण्यासोबतच वर्तमानकाळातील गरजा आणि व्यवधाने यांच्या आधारावर विकासाची रणनीती तयार करत आहेत. कार्यस्थळांबाबत बोलायचे झाले तर तेथेही बदल अभूतपूर्व आहेत. आयएलओनुसार, जगभरात फीमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट (एफएलएफपीआर) जवळपास ४९ टक्के आहेत. महिला नोकऱ्यांची शिडी चढत आहेत, त्यामुळे कार्यस्थळी महिलांनी एकजूट होणे गरजेचे आहे. कार्यालयांत पुरुषांनीही महिलांना सोबत घेतल्यास त्यांना मदत होईल आणि मुली-महिलांनाही प्रोत्साहन मिळेल. आज एखादी आघाडी उभी करण्यासाठी कुठल्याही संस्थेत फक्त व्हॉट्सअॅप ग्रुपची गरज असते. कार्यस्थळीही लिंग ओळख स्वीकारण्याची प्रकरणे वाढतील. आपण सध्या त्यांच्याशी अपरिचित आहोत. आतापासूनच लिंग तपासणी शस्त्रक्रियेसाठी सुटी आणि रीएम्बर्समेंट, ट्रान्सजेंडर्ससाठी कार्यालयात टॉयलेट आणि होमोफोबियाला तोंड देणे हे एचआरच्या कामाचा भाग झाला आहे.  
इस्रोने अलीकडेच ‘व्योमित्रा’ हा पाय नसलेला महिला रोबोट आणला असून तो गगनयान प्रकल्पाचा पहिला प्रवासी ठरणार आहे. तो किंवा त्याच्याप्रमाणेच आणखी एखादा ह्युमोनाइड मानव मिशनसोबत जातील. तांत्रिकदृष्ट्या आधुनिकीकरणासोबतच कार्यस्थळ हे फक्त मानवाचेच क्षेत्र राहणार नाही. संवेदनशीलता आणि बुद्धिमत्तेने परिपूर्ण रोबोट्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे आपल्या कार्यालयाचे प्रमुख भाग असतील. पुरुष, महिला, वेगवेगळी ओळख असलेले लोक, यंत्रे, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वातावरणाचे आव्हान पेलणे हे महिला व्यवस्थापकांसाठी आव्हान असेल. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपण पुरुषसत्तेच्या शृंखला तोडून पुढे जात आहोत तेव्हा आपल्याला भविष्यातील जगासाठी तयार राहावे लागेल. पुढील मार्ग पुरुषांच्या विरोधातील नाही. जसजसे आपले परिदृश्य समोर येत आहे तसतसे आपल्याला मिळून-मिसळून राहणे, दयाळू होणे आणि सर्वसमावेशक व्हावे लागेल. 

आपण महिला आहोत यासाठी नाही, कारण भविष्यात फायदा फक्त निवडकांनाच होऊ नये, भूतकाळात तो तसा होत होता. भविष्य महिलांच्या बरोबरीचे आहे, वाट्याचे नव्हे; सबलीकरणाचे आहे, सुधारणांचे नव्हे आणि ते संधींचेही आहे. प्रत्येकासाठी-महिला, पुरुष आणि इतर सर्वांसाठी. 

बातम्या आणखी आहेत...