आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Under 19; India Vs Pakistan Semi Final, Live ICC Under 19 Cricket World Cup Cricket Score And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताची उपांत्य सामन्यामध्ये पाकवर १० गड्यांनी मात; सलग तिसऱ्यांदा फायनल गाठणारा भारत पहिला संघ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • टीम इंडियाने सातव्यांदा अंतिम फेरी गाठली, आतापर्यंत चार वेळा विश्वविजेता
  • विश्वचषकात यशस्वीचे ५ सामन्यांत चाैथे अर्धशतक साजरे

पोचेफस्ट्रूम - चार वेळच्या विश्वविजेत्या भारतीय युवा संघाने कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपले निर्विवाद वर्चस्व अबाधित ठेवले. यशस्वी जैस्वाल (१०५) आणि दिव्यांश सक्सेनाच्या (५९) अभेद्य दीड शतकी भागिदारीच्या बळावर भारतीय संघाने मंगळवारी १९ वर्षंाखालील विश्वचषकाची फायनल गाठली. भारताने उपांत्य सामन्यामध्ये पाकिस्तानवर मात केली. भारताने  ३५.२ षटकांत १० गड्यांनी सामना जिंकला. यासह भारताने सलग तिसऱ्यांदा  विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठणारा भारत हा पहिलाच संघ ठरला. भारताने आेव्हरऑल सातव्यांदा अंतिम फेरीमधील प्रवेश निश्चित केला. आतापर्यंत भारताने चार वेळा विश्वविजेतेपदाचा बहुमान पटकावला आहे. आताही भारताची नजर यावर लागली आहे.

पाकने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासमाेर विजयासाठी १७३ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. युवा सलामीवीर यशस्वी आणि दिव्यांशने नाबाद खेळी करताना संघाला ३५.२ षटकांत माेठा विजय मिळवून दिला. या दाेघांनी पाकच्या सुमार गाेलंदाजीचा  खरपुस समाचार घेताना अभेद्य दीड  शतकी भागीदारी नाेंदवत  विजय निश्चित केला.  

पाकविरुद्ध विजयी चाैकार : भारताच्या युवा संघाने पाकविरुद्ध आपली विजयी माेहीम कायम ठेवली. भारताने विश्वचषकात पाकवर हा चाैथा विजय मिळवला. भारताचा या संघाविरुद्धचा हा सर्वाधिक आणि सलग असा चाैथा  विजय नाेंद झाला.

विश्वचषकात यशस्वीचे ५ सामन्यांत चाैथे अर्धशतक साजरे


सध्याच्या विश्वचषकात भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल अधिकच फाॅर्मात आहे. त्याने स्पर्धेतील पाच सामन्यांत चाैथे अर्धशतक साजरे केले. आतापर्यंत त्याच्या नावे ३१२ धावा नाेंद झाल्या. या  स्पर्धेत ३०० पेक्षा अधिक धावा काढणारा यशस्वी हा पहिला फलंदाज ठरला. त्याचे विश्वचषकातील हे पहिले शतक ठरले.

  • तिसऱ्यांदा भारत-पाक यांच्यात उपांत्य सामना झाला. यात भारताच्या दाेन, पाकच्या १ विजयाची नाेंद.
  • पहिल्यांदाच संघाने युवांच्या वर्ल्डकपचा नाॅकआऊट सामना १० गड्यांनी जिंकला आहे

वर्षभरापासून विश्वचषकात विजयी माेहीम कायम 

सलग पाचव्या विजयाच्या बळावर भारतीय संघाने यंदाच्या विश्वचषकाची फायनल गाठली. भारताने गत वर्षी एकही सामना न गमावता किताब जिंकला हाेता. विश्वचषकात भारताने सलग ११ विजयासह आपले वर्चस्व राखले आहे. शेवटच्या २०१६ च्या फायनलमध्ये विंडीजने भारतावर मात केली हाेती.टर्निंग पॉइंट :  ३५ व्या षटकांत दिव्यांशने झेप घेऊन हॅरिसचा झेल घेतल


३५ व्या षटकांच्या चाैथ्या  चेंडूवर फिरकीपटू अथर्वच्या चेंडूवर हॅरिसने ओवर डीप स्क्वायरचा फटका मारला. मात्र, त्याच क्षणी तात्काळ डाइव्ह मारून दिव्यांशने शानदार झेल घेतला. यादरम्यान पाक  संघ ४ बाद १४६ धावांवर हाेता.   त्यानंतर पाकने सहा विकेटनंतर २६ धावांची कमाई करत पराभव पत्कारला.