आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Under Construction Buildings Collapsed Several Killed In Pulikeshi Nagar Bengaluru

बंगळुरूत बांधकाम सुरू असताना दोन इमारती कोसळल्या; 4 जणांचा मृत्यू, 7 जणांना बाहेर काढले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - कर्नाटकच्या राजधानीत बांधकाम सुरू असताना दोन इमारती कोसळल्या आहेत. या भयंकर अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 7 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. पहिली इमारत मंगळवारी रात्री पुलिकेशी नगर परिसरात कोसळली. याच ठिकाणी चौघांचा मृत्यू झाला. पोलिस आणि एनडीआरएफच्या पथकाने या ढिगारातून 7 जणांना बाहेर काढले. तर दुसरी इमारत कूके परिसरात कोसळली. या ठिकाणी कुठल्याही जीवितहानीचे वृत्त नाही.


दोन्ही इमारतींचा ढिगारा उचलण्यासाठी बचाव कार्यासाठी बुधवारी सकाळी सुद्धा पथक तैनात होते. महापौर गंगाम्बिका मल्लिकार्जुन यांनी सांगितल्याप्रमाणे, 'वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला दोन्ही इमारती कोसळल्याची माहिती दिली. त्या इमारतींच्या बांधकामात कायद्याचे उल्लंघन झाले आहे. मंजुरी नसतानाही इमारतीमध्ये एका अतिरिक्त मजल्याचे बांधकाम केले जात होते. यासंदर्भात सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.'
 

बातम्या आणखी आहेत...