आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Under The Name Of The Smart City The City Being Satire; GST Enough , Earlier VAT Was Good

स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहर होतेय विद्रुप; जीएसटीने बस्स झाले, पूर्वीचा 'व्हॅट' होता बरा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर : स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराचे विद्रुपीकरण होते आहे. जुनेच चांगले होते असे म्हणायची वेळ आली आहे. पूर्वीचे व्हॅट करच चांगले होते, आता जीएसटीने बस्स झाले आहे, अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी संवाद कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मांडली. ओल्ड ईज गोल्ड होते. मी सांगते लक्षात घ्या, पूर्वीचे सरकारच चांगले होते.    संवाद यात्रेदरम्यान सोलापूर दौऱ्यात आयएमए सभागृहात २४ रोजी सायंकाळी ६ वाजता संवाद आयोजिला होता. यावेळी ममता कुलकर्णी यांनी पंतप्रधान आरोग्य निधी सुरू करावी, राजू राठी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीएसटीत फरक काय, डॉ. मिलिंद मिरे यांनी महाराष्ट्रात हॉमिओपॅथीचे शासकीय रुग्णालय हवे, पराग शहा यांनी सर्व जिल्ह्यात समान विकास, समान शैक्षणिक सुविधा, समान इंडस्ट्रीज व्हावी, पशुपती माशाळ यांनी डाळ मिलमधील डाळीवरील जीएसटी रद्द व्हावी, नारायण सुर्वे यांनी मजूर पुरवठ्यावरील १८ टक्के जीएसटी रद्द व्हावी, पेंटप्पा गड्डम यांनी वस्त्रोद्योग अडचणीत असून एक्पोर्टला चालना मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत, केतन शहा यांनी स्मार्ट सिटीच्या कामात भ्रष्टाचार होत आहे तो थांबवा, मिलिंद भोसले यांनी स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराचे सौंदर्य खराब केले जात आहे, पूर्वीचेच शहर चांगले होते, किशोर चंडक यांनी उत्पादित वस्तूवर मनपाचा टॅक्स कमी व्हावा, अशा मागण्या मांडल्या. सर्व प्रश्न शांतपणे ऐकून घेत सुप्रिया सुळे यांनी टॅक्स कमी करणे, विमानतळ सुरू करणे, स्मार्ट सिटी कामे आदींचा प्राधान्याने पाठपुरावा करण्याची हमी दिली. तसेच अनेकांना त्यांनी व्हाॅट्सअप नंबर आणि ईमेल आयडी दिला.    वेळेअभावी कार्यकर्त्यांशी झाला नाही संवाद दुपारी चार वाजता शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि मार्गदर्शन असा कार्यक्रम ठरला होता. मात्र वेळेअभावी फक्त गाठीभेटी झाल्या. मार्गदर्शन झाले नाही. त्या गर्दीत लक्ष्मी बिराजदार यांनी महिला बचत गटाच्या कडक भाकऱ्या भेट दिल्या. अंगणवाडी शिक्षिका, महिला बचत गटाच्या महिलांनी मागण्यांचे निवेदन दिले.     छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी केली प्रश्नांची सरबत्ती  विद्यापीठाच्या प्रश्नांसाठी पत्र लिहीन, आंदोलनही करू  जिल्ह्याला स्वतंत्र विद्यापीठ आहे, तरी दर्जात्मक काम हाेत नाही. विद्यार्थी फोटोकॉपी मागतो, पण वेळेत मिळत नाही. अनेकदा आवाज उठविला. मात्र विद्यापीठ सकारात्मक प्रतिसाद देत नाही, याचा खूप त्रास होतोय. यावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, या विषयावर इतक्या सूचना येत आहेत, मी स्वत: विद्यापीठाला पत्र लिहीन. आंदोलनाची तीव्रता वाढवू, असे सांगून विद्यार्थ्यांमध्ये लढ्याची प्रेरणा िनर्माण करण्याचा प्रयत्न केला.    छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे शनिवारी सायंकाळी हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी मनोहर सपाटे, महेश गादेकर, दिलीप कोल्हे संतोष पवार, लता फुटाणे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुहास कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.    चैतन्य घोडके, हा अभियांत्रिकी अंतिम वर्षाचा विद्यार्थी म्हणाला, सरकारने माहिती अधिकारात खूप बदल केला. आर्टिकल १३ व आर्टिकल १६ याबाबत काही करता येईल काय ? त्यावर सुळे म्हणाल्या, मी पार्लमेंट मध्ये खूप आवाज उठवला. न्यायालयीन लढाही लढला जाणार आहे. आरटीआय पूर्वी जसे होते, तसेच असला पाहिजे, यासाठी याचिका दाखल होत आहेत. ३७० कलम रद्द झाले, ३५ ए आर्टिकल आहे, तर ३५ बी, ३५ सी, ३५ डी हे का रद्द होत नाही, सरकारविरूद्ध संसदेत आवाज उठविला जावा अशी अपेक्षा एका विद्यार्थ्याने व्यक्त केली. त्यावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, मी लोकसभेतही यावर बोलले, ते भाषण फेसबुकवर आहे, आता ते प्रचाराला येतील ना तेव्हा हा प्रश्न त्यांनाच विचारला जावा.    ३७० मधीलबद्दल विधानसभेत प्रचाराचा मुद्दा होऊ शकेल काय ? यावर राष्ट्रप्रेम प्रत्येकाने केलेच पाहिजे, आज आपल्याकडे जी आव्हाने आहेत, दुष्काळ आणि पूर हे प्रश्न आहे. बेरोजगारीचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. हे मेन स्ट्रीमचे प्रश्न आहेत. ते लोकांपर्यंत सातत्याने बोलले पाहिजे, असे सुळे म्हणाल्या.    सोलापुरात मोठे उद्योग नाहीत, येथील विद्यार्थी पुणे मुंबई कडे आशेने पाहतात, स्मार्ट सिटीत दर्जाहीन कामे होत आहेत, एकच रस्ता दोनदा- तीनदा खाेदला जातो आहे, आयटी पार्क नाही, अशा प्रश्नांची विद्यार्थ्यांनी सरबत्तीच केली. खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्मपक अशी उत्तरे दिली.   

बातम्या आणखी आहेत...