आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमीनीच्या 400 मीटर खोल चालतो हा कॅफे, 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांना No Entry

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - सर्बियात जमीनीच्या तब्बल 400 मीटर खोल एक कॅफे चालवला जातो. या कॅफेचे वैशिष्ट्य म्हणजे, येथे 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्यांना एंट्री मिळते. त्यापेक्षा कमी वय असलेल्यांना यात प्रवेश दिला जात नाही. सोबतच, प्रत्येकाला कॅफेमध्ये येताना हेलमेट घालण्याची सक्ती आहे. कॅफेमध्ये जाण्यासाठी लिफ्टची देखील सुविधा देण्यात आली आहे.


या कॅफेमध्ये जाणारी तरुणी मिलिका सांगते, "मी पहिल्यांदा या कॅफेत जात आहे. आत जाण्यापूर्वी मी प्रचंड घाबरले होते. एकदा आत गेल्यावर परत येऊ शकणार की नाही याचीच मला भीती होती. परंतु, सर्वच काही सुरळीत होते." या खाणीतील गाइड आणि कर्मचारी सासा सरबुलोविक यांनी सांगितल्याप्रमाणे, "येथे प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला काही ठराविक नियमांचे पालन करावे लागते. अर्थात कुणाचेही वय 18 वर्षांपेक्षा कमी असता कामा नये. सोबतच, ते शारीरिकरित्या पूर्णपणे सक्षम असायला हवे. एकट्यात येणाऱ्यांना येथे प्रवेश दिला जात नाही. प्रत्येकाला समूहातच किंवा जोडप्यातच यावे लागते."


अंडरवॉटर रेस्त्रां 'अंडर'
नॉर्वेच्या लिंडेसनेस परिसरात असलेल्या सागरी किनाऱ्यावर जगातील सर्वात मोठे अंडरवॉटर रेस्तरॉ तयार केले जात आहे. 110 फुट लां असलेले हे रेस्तरॉ एखाद्या टेलिस्कोपसारखे दिसणार आहे. यात 100 लोक बसण्याची क्षमता राहील. रेस्तरॉ 2019 पर्यंत पूर्णपणे तयार होणार आहे. त्यास 'अंडर' असे नाव देण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...