Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | underground electricity in Ganeshotsav festival

भूमिगत वीजवािहन्यांसाठी गणेशोत्सवानंतरचा मुहूर्त

प्रतिनिधी | Update - Sep 01, 2018, 12:43 PM IST

शहरातील मिरवणूक मार्गात टाकण्यात येणाऱ्या भूमिगत वीजवाहिन्यांना तब्बल आठ वर्षांनंतर मुहूर्त िमळाला आहे. गणेशोत्सवानंतर

  • underground electricity in Ganeshotsav festival

    नगर- शहरातील मिरवणूक मार्गात टाकण्यात येणाऱ्या भूमिगत वीजवाहिन्यांना तब्बल आठ वर्षांनंतर मुहूर्त िमळाला आहे. गणेशोत्सवानंतर भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अिभयंता संतोष सांगळे यांनी शुक्रवारी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना दिली.


    नगर शहरातून गणेश विसर्जन, शिवजयंती, मोहरमची कत्तलची रात्र व ताबूत विसर्जन या चार सार्वजनिक मिरवणुका िनघतात. या मिरवणूक मार्गावरील लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा हटवून भूिमगत वीजवाहिन्या टाकण्याचा िनर्णय महािवतरणने २०१० मध्ये घेतला होता. मात्र, या भूिमगत वीजवाहिन्या टाकण्याच्या कामाला गेल्या आठ वर्षांपासून मुहूर्तच लागलेला नव्हता. बंगाल चौकी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम झाले आहे. आता उर्वरित कामाला गणेशोत्सवानंतरच चौपाटी कारंजा, दिल्लीगेट, आडते बाजार, तेलीखूंट, कापडबाजार, भिंगारवाला चौक, नवी पेठ, चितळे रस्ता या मार्गावर भूिमगत वीजवहिन्या टाकण्याच्या कामाला मुहूर्त लागणार आहे. या कामासाठी खासदार दिलीप गांधी यांनीही ११ कोटींचा निधी मंजूर केला आहे. िनधी कमी पडल्यास केंद्राच्या योजनेतून हे काम पूर्ण करू, असे अधीक्षक अभियंता सांगळे यांनी सांिगतले.


    कशासाठी टाकणार भूिमगत वीजवािहनी?
    शहरात गणेश विसर्जन, शिवजयंती, मोहरमच्या दोन अशा चार िमरवणुका काढण्यात येतात. ज्या मार्गावरून मिरवणूक िनघते, त्या मार्गावर विजेच्या तारा कमी उंचीवर आहेत, तर काही िठकाणी लोंबकळत आहेत. त्यामुळे अपघात होऊन दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे विजेच्या तारा काढून भूिमगत वीजवाहिन्या टाकून वीज पुरवठा करण्यात येणार आहे.

Trending