आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेट्रोसाठी खोदकाम, पुण्यात सापडले ५७ मीटर लांब भुयार, बांधकाम 70 ते 80 वर्षांपूर्वीचे असल्याचा अंदाज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पुणे- शहरात सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. स्वारगेट भागात  मल्टिमोडल हब उभारणीच्या कामासाठी खोदकाम सुरू असताना  बुधवारी विटांनी बांधलेला भुयारी मार्ग सापडला.

 

जमिनीच्या 12 ते 15 फूट खाली असलेल्या या भुयाराची लांबी 57 मीटर असून एकाच वेळी दोन ते तीन व्यक्ती या बोगद्यातून सहज जाऊ शकतात. या भुयाराला दोन भिंती आहेत.

 

इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे म्हणाले, पूर्वी नेहरू स्टेडियमसमोर पालिकेचे जलतरण केंद्र होते. या भुयाराची रचना पाहून, टिळक रस्त्याच्या दिशेने पाणी वाहून नेण्यासाठी हे वॉटर चॅनल बांधल्याचे स्पष्ट होते. हे बांधकाम 70 ते 80 वर्षांपूर्वीचे असावे.

बातम्या आणखी आहेत...