Home | International | Other Country | Underwear park, old planes, helicopter, ten old army tanks and vehicles kept in the sea from Lebanon

लेबनॉनकडून समुद्रात अंडरवॉटर पार्क, जुनी विमाने, हेलिकॉप्टर, लष्कराचे दहा जुने रणगाडे आणि वाहने समुद्राच्या तळात ठेवली

वृत्तसंस्था | Update - May 13, 2019, 10:38 AM IST

फ्रेंड्स ऑफ जिरा बेटावरील समुद्रातील कचरा स्वच्छ करण्यासाठी पर्यावरणप्रेमी एकवटले

  • Underwear park, old planes, helicopter, ten old army tanks and vehicles kept in the sea from Lebanon

    सिडन - लेबनाॅनचे फ्रेंड्स ऑफ जिरा आयलँड अँड सिडन्स बीच असोसिएशन समुद्रात पार्कची उभारणी करत आहे. यासाठी संघटनेचे पर्यावरणवादी शनिवारी सिडन शहरातील भूमध्य सागर किनाऱ्यावर जमले होते. त्यांनी भूमध्य समुद्रात जुने विमान तळात नेले. सिडनमध्ये अंडरवॉटर पार्क तयार करण्याचे काम गेल्या वर्षीच सुरू झाले. तेव्हापासून अनेक प्रकारचे साहित्य समुद्रात उतरवण्याचे काम सुरू झाले आहे. या अंडरवॉटर पार्कद्वारे लोकांना समुद्री जीवनाची माहिती करून देण्याचा विचार आहे. म्हणून लोकांना समुद्रात वास्तव्य करता यावे, यासाठी पार्क तयार केला जात आहे. संघटनेचे प्रतिनिधी कमेल कोजबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंडरवॉटर पार्क पाणबुड्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरेल. बुडवण्यात आलेली विमाने, वाहने आणि समुद्रातील शेवाळापासून चांगले निवासस्थान तयार करता येऊ शकते. लेबनॉनमध्ये भूमध्य समुद्रात २०० किमी परिसरात समुद्री कचरा साठलेला आहे. तज्ज्ञांच्या मते, हा समुद्री परिसर खूप प्रदूषित झालेला आहे.

    लष्कराचे रणगाडे समुद्रात उतरवले
    संघटनेने अंडरवॉटर पार्क तयार करण्यासाठी गेल्या वर्षी लष्कराचे दहा जुने रणगाडे व अन्य वाहने समुद्राच्या तळात नेली होती. या रणगाड्यांचे तोंड इस्रायलच्या दिशेने ठेवण्यात आले आहे. यामुळे इस्रायलसोबत तणाव वाढतो आहे. येथील लोक इस्रायलला शत्रू समजतात.

Trending