आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊद इब्राहिमचा पंटर दानिश अली पोलिसांच्या ताब्यात, शस्त्र तस्करीप्रकरणी अमेरिकेत झाली होती अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या सोहेल कासकरसह तिघांना शस्त्र तस्करीप्रकरणी काही दिवसांपूर्वी अमेरिकेत अटक करण्यात आले होते. आरोपींचा ताबा मिळविण्यासाठी भारताकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु होते. या प्रयत्नांना आता यश आले आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी आणि सोहेल कासकरचा खास सहकारी दानिश अली याचा पोलिसांना ताबा मिळाला आहे.

 

दानिश सध्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिस कस्टडीत आहे. दानिशला 20 दिवसांसाठी ताबा मिळाला असल्याची माहिती मिळाली आहे. दानिशच्या जीवाला धोका असल्यामुळे पोलिसांनी त्याच्या अटकेबाबत कमालीची गुप्तता बाळगली होती.

 

सोहेल कासकरला भारतात आणणार..
दाऊद इब्राहिमपर्यंत पोहोचण्याचे भारताचे प्रयत्न सुरु आहे. यासाठी सोहेल कासकार याचा ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, भारतात सोहेल कासकर विरोधात एकही गुन्हा दाखल नाही आहे. परंतु कासकरच्या माध्यमातून दाऊदशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती सुरक्षा एजन्सीला मिळू शकते.
 
दिल्लीचा राहणारा आहे दानिश
दानिश हा दिल्लीचा राहणारा आहे.  दिल्लीत जामा मशिद परिसरात त्याचे घर आहे. त्याचे वडील जामा मशिदीत साफ सफाईचे काम करतात. दानिशने अर्ध्यातच शिक्षण सोडले होते. 2001 मध्ये तो नोकरीच्या शोधात दुबईत गेला होता. तिथे त्याची ओळख सोहेल कासकर याच्याशी झाली होती. दानिश याने 3 वर्षे कासकरसोबत काम केले होते.

 

बातम्या आणखी आहेत...