आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Underworld Don Ravi Pujari Arrested In India; Wanted In More Than 200 Serious Crimes

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी आला भारताच्या ताब्यात; 200 हून अधिक गंभीर गुन्ह्यांत वाँटेड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू : अंडरवर्ल्ड डॉन म्हणून एकेकाळी ओळख असलेला फरार कुख्यात गुन्हेगार रवी पुजारी याचा ताबा भारताला िमळाला आहे. सोमवारी सकाळी कर्नाटक पोलिस त्याला घेऊन भारतात दाखल होत आहेत. खंडणी आणि हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांत १५ वर्षांपासून तो पोलिसांना हवा होता. 

पुजारी याला दक्षिण आफ्रिकेत अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जानेवारी २०१९ मध्ये सेनेगलच्या ताब्यात देण्यात आले होते. सेनेगल प्रशासनाने पुजारी याला भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. सूत्रांनुसार, एनआयए, सीबीआय आणि रॉचे अधिकारी आता पुजारी याची चौकशी करतील. पुजारी याच्याविरुद्ध खंडणी आणि हत्यांसह २०० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड आणि दहशतवाद्यांचा म्होरक्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुख्यात दाऊद इब्राहिमसाठी पुजारी एकेकाळी काम करत होता. मात्र, नंतर तो फरार झाला.