आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याचा निषेध करणाऱ्या तरुणांवर झालेल्या गोळीबारामागे सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा हात असल्याची भीती व्यक्त करताना काँग्रेसचे गाैरव गाेगाेई यांनी देशाचा खरा शत्रू आंदाेलन करणारे युवक नसून गरिबी, बेराेजगारी आणि असमानता असल्याचे विधान केले.
सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना गोगाेई म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचे राजकारणी आपल्या कार्यकर्त्यांना या देशातील जनता तुमची शत्रू असल्याचे समजावून सांगत आहेत आणि पोलिसांसमोर उघडपणे गोळीबार केला जात आहे.
ज्याच्या हातात पिस्तूल हाेते त्या मुलाने आंदाेलनकर्त्या विद्यार्थ्यांवर गाेळीबार केलेला नाही. वास्तविक असे करण्यासाठी त्या मुलाला चिथावणी देणारा ताे मंत्री वा त्या राजकीय नेत्याने त्याचा ट्रिगर दाबला असल्याचा आराेप करून ते पुढे म्हणाले, सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याने आपल्या मंत्र्यांच्या चिथावणीखोर भाषणाचा निषेध केला नाही आणि मला असे वाटते की, कदाचित त्यामागील पक्षातील सर्वोच्च नेत्यांची मूक संमती असावी. काँग्रेसचे सदस्य पुढे म्हणाले, देशाचे शत्रू आंदाेनकर्ते विद्यार्थी नाहीत ना आंदाेलन करणारे नेते. देशाचे खरे शत्रू तर बेराेजगारी, गरिबी आणि असमानता आहे.
ते म्हणाले, आपण विखारी आणि द्वेष पसरवणाऱ्या राजकारणाकडून आशादायक वातावरण निर्माण करणाऱ्या राजकारणाकडे वाटचाल केली तरच आपला देश प्रगती करू शकेल. सरकारने एक फेब्रुवारीला सादर केलेल्या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले, या अर्थसंकल्पामुळे घसरणाऱ्या विकास दराला पुन्हा उभारी मिळणार नाही, चार दशकांच्या उच्चांकी पातळीवर गेलेली बेराेजगारी कमी हाेणार नाही. सरकारने उद्याेगांएेवजी ग्रामीण अर्थव्यवस्थेवर लक्ष दिले पाहिजे. कारण ग्रामीण अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली तरच अन्य क्षेत्रांच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा हाेऊ शकेल याकडे गाेगाेई यांनी लक्ष वेधले. गोगोई म्हणाले की, लाेकांना रस्त्यावर उतरावे लागते ही देशाची आजची खरी स्थिती आहे. एकदाच निवडणुका जिंकून लाेकशाहीच्या मूल्यांचे रक्षण हाेत नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.