आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरोजगारीचा दर ४५ वर्षांतील सर्वाधिक ६.२१%; शहरी भागात ७.८ टक्के युवक बेरोजगार, ग्रामीण भागात ५.३ टक्के

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वर्ष २०१७-१८ या काळात देशातील बेरोजगारी वाढीचा दर ६.१ टक्के राहिला. मागील ४५ वर्षांतील हा सर्वाधिक दर आहे. सांख्यिकी मंत्रालयाने शुक्रवारी जुलै २०१७ ते जून २०१८ या काळातील पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे जारी केला. जानेवारीत एक वृत्तपत्राने हा अहवाल प्रसिद्धीपूर्वीच प्रकाशित केला होता. मात्र सरकारने आकडेवारी अंतिम नसल्याचे सांगत बेरोजगारीचा हा ४५ वर्षांतील सर्वाधिक दर असल्याचा इन्कार केला होता. हा अहवाल प्रकाशित न केल्याबद्दल सांख्यिकी आयोगाच्या दोन सदस्यांनीही राजीनामे दिले होते. मोदी सरकारच्या शपथग्रहणाच्या दुसऱ्याच दिवशी हा अहवाल जारी करून बेरोजगारी वाढीचा दर ६.१ टक्के असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सर्व्हेनुसार शहरात ७.८ टक्के युवक बेरोजगार आहेत.

 

शहरी भागात ७.८ टक्के  युवक बेरोजगार, ग्रामीण भागात ५.३ टक्के 
> सर्व्हेनुसार शहरात ७.८ टक्के युवक बेरोजगार आहेत, तर ग्रामीण भागात हाच दर ५.३ टक्के राहिला. पुरुषांत बेरोजगारीचा दर ६.२ टक्के  असून महिलांत हे प्रमाण ५.७ टक्के आहे. एकूण कार्यक्षम मनुष्यबळातील बेरोजगार लोकांच्या संख्येेवरून बेरोजगारीचा दर ठरत असतो. सर्व्हेनुसार देशात दरवर्षी एक कोटी बेरोजगार युवकांची फौज तयार होते. १२,८०० वसाहतींतील एक लाख कुटुंबांचा सर्व्हे  करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...