Home | Business | Business Special | unemployment rise four year high during demonetisation

पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाने बेरोजगारांचे झाले हाल, रिपोर्टमध्ये झाला खुलासा...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 12, 2019, 02:58 PM IST

बेरोजगारीने मागच्या 4 वर्षातील रोकॉर्ड तोडला.

 • unemployment rise four year high during demonetisation

  नवी दिल्ली- लोकसभा निवडणुका लवकरच येणार आहेत. अशातच मोदी सरकारच्या मागील 4 वर्षांचा लेखा-जोखा पाहायला गेलात तर त्यात काही चांगली कामे झाली तर काहींमुळे जनजीवण विस्खळीत झाले, त्यातली एक आहे नोटबंदी. लेबर ब्यूरोच्या एका ताज्या सर्वेनुसार, देशात नोटबंदीनंतर बेरोजगारीने 4 वर्षांचा रेरॉर्ड तोडला आहे. रिपोर्टमध्ये हेही समोर आले आहे की, देशात बेरोजगारांची संख्या वाडतच आहे. त्याबरोबरच नोटबंदीने नोकऱ्यांवर खुप वाईट प्रभाव पाडला आहे.

  नोटबंदीमुळे अनेक सेक्टरमधल्या लोकांना हकालपट्टी
  नोटबंदीने ऑटोमोबाइल, टेलीकॉम सेक्टर, एअरलाइंस, कंस्ट्रक्शन सारख्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या नोकरीवर गदा आणली. रिपोर्टनुसार, 2016-17 मध्ये बेरोजगारी दर 3.9 टक्के होता, 2015-16 हा 3.7 झाला. 2013-14 मध्ये बेरोजगारी दर 3.4 होता. बेरोजगारी दर म्हणजे एका खास प्रमाणात श्रमबल उपलब्ध आहे पण त्यांना नोकऱ्या नाहीयेत.


  आता NSSO कडून केले जातील सर्वे
  मीडीया रिपोर्टनुसार, हा लेबर ब्यूरोचा अंतिम सर्वे आहे याची जागा आता नॅशनल सँपल सर्वे ऑफिस (NSSO) कडून सर्वे केले जातील. रिपोर्टनुसार, शहरी भागात पुरूंषांमधील रोजगाराचा दर खुप कमी झाला आहे.

Trending