आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजेनेवा - पाकिस्तानने मंगळवारी संयुक्त राष्ट्र संघात काश्मीरचा मुद्दा उचलुन धरला. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी भारताने जम्मू-काश्मीर मध्ये केलेल्या कारवाईचा तपास करण्याची यूएनकडे मागणी केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना कुरेशी यांनी सत्य मान्य करत जम्मू-काश्मीर हा भारताचाच भाग असल्याचे सांगितले.
कलम 370 रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. यादरम्यान पाकिस्तानने राजनयिक संबंध कमी करण्यासह भारताविरोधात अनेक निर्णय घेतले. पाकिस्तानने बिसारियाला दिल्लीला परत पाठवले होते. भारतीय प्रतिनिधी मंडळ काश्मीरमधील मानवाधिकारांच्या होणाऱ्या उल्लंघनाच्या आरोपांवर उत्तर देणार आहे. प्रतिनिधी मंडळाने जेनेवामध्ये यूएनएचआरसीची अध्यक्षा मिशेल बेस्लेट यांची भेट घेत कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या स्थितीबद्दल माहिती दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.