आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्यंत लज्जास्पद..3 महिन्यांच्या गरोदर गायीवर बलात्कार; गुप्तांगातून भळभळत होते रक्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क- आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात अत्यंत लज्जास्पद घटना घडली आहे. अज्ञात नराधमांनी एका गायीवर बलात्कार केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडित गाय तीन महिन्यांची गरदोर आहे. शेतकर्‍याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

काय आहे हे प्रकरण?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गाय मालकाचे नाव राजू असे आहे. राजूने सांगितले की, तो सकाळी उठला असता. गोठ्यात त्याला गाय दिसली नाही. त्याने सर्वत्र गायीचा शोध घेतला. मात्र, गाय दिसून आली नाही. काही अंतरावर असलेल्या शेतात एका झाडाला गाय बांधलेली दिसली. गायीच्या गुप्तांगातून रक्त भळभळत होते.

 

राजूने गायीला तत्काळ डॉक्टराकडे नेले. गायीवर बलात्कार झाल्याचा खुलासा डॉक्टरांनी केला. नंतर राजूने पोलिसांत याप्रकरणी तक्रार नोंदविली. ही घटना परिसरात वार्‍यासारखी पसरली. या घृणास्पद घटनेचा स्थानीय लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. नराधमांना अटक करून त्यांच्यावर कठोर शिक्षा करण्याची मागणी स्थानिक लोकांनी केली आहे. पो‍लिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

बातम्या आणखी आहेत...