आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी अमरावतीत, अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कारांच वितरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या मंगळवार.दि. ११ सप्टेंबरला अमरावती दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनच्या अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कारांचे वितरण होणार आहे. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात मंगळवारी दु. २ वाजता हा कार्यक्रम होईल. पालकमंत्री प्रवीण पोटे, खा.डॉ. विकास महात्मे, खा. आनंदराव अडसूळ, आ.ॲड. यशोमती ठाकूर यावेळी उपस्थित राहतील. 


केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन ११ सप्टेंबरला स. १०.२५ वाजता विमानाने दिल्ली येथून नागपूर विमानतळावर आगमन होईल. दु. १२.१० वा. तेथून नागपूर येथे आगमन. दु. १२.१५ वाजता नागपूर येथून वाहनाने अमरावतीकडे प्रस्थान. दु. १.५० वाजता अमरावती येथे आगमन. दु. २ ते ४.४५ वाजता अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थिती. सायं. ५ वाजता अमरावती येथून वाहनाने नागपूर विमानतळाकडे प्रस्थान. 

बातम्या आणखी आहेत...