• Home
  • Business
  • union government slashes corporate tax to boost economy, announces nirmala sitaraman

मोठा निर्णय / कॉर्पोरेट टॅक्स कमी करत असल्याची केंद्र सरकारची घोषणा, सरकारच्या निर्णयाचे शेअर बाजाराकडून स्वागत

आर्थिक संकटातून सावरण्यासाठी सरकारने कॉर्पोरेट टॅक्स घटवला, अर्थमंत्र्यांची घोषणा

Sep 20,2019 01:22:08 PM IST

पणजी - देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने कॉर्पोरेट टॅक्स कमी करत असल्याची मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गोव्यात शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेचा बाजारावर चांगला परिणाम दिसून आला. कॉर्पोरेट टॅक्स घटवल्याची घोषणा होताच शेअर बाजारात 1900 अंकांची उसंडी पाहायला मिळाली.

विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी आयकर अॅक्टमध्ये नवीन तरतूद टाकण्यात आली आहे. ते 2019-20 या आर्थिक वर्षातच लागू होतील. ज्या कंपन्या कुठल्याही प्रकारचे अपवाद आणि इन्सेंटीव्हचा फायदा घेत नाहीत त्यांना 22 टक्के दराने आयकर भरता येईल. सर्वच प्रकारचे सरचार्ज आणि सेस मिळून त्यांना एकूण 25.17 टक्के इतका आयकर द्यावा लागणार आहे. सोबतच नवीन नियमानुसार, कंपन्या 1 ऑक्टोबर 2019 पासून नव्याने उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक करून 15 टक्के या दराने आयकर भरता येईल. यातून मेक इन इंडिया मोहिमेला देखील प्रोत्साहन मिळेल. उल्लेखनीय बाब म्हणजे, कॉर्पोरेट टॅक्समध्ये यापूर्वी सेस आणि सरचार्ज मिळून कंपन्यांना 34.94% टॅक्स लावले जात होते. अर्थातच त्यामध्ये जवळपास 10 टक्के घट करण्यात आली आहे.

X