आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Union Home Minister Amit Shah On Jammu Kashmir Situation After Article 370 Abolished

काश्मीरात 5 ऑगस्टपासून ना एकही गोळी झाडली गेली, ना कुणाचा जीव गेला -अमित शहा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काश्मीरात शांततामय आणि मोकळे वातावरण असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केला. 5 ऑगस्टपासून 17 सप्टेंबर पर्यंत जम्मू आणि काश्मीरात एकही गोळी झाडल्या गेली नाही आणि कुणाचा जीव देखील गेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार देशात सुरक्षिततेच्या बाबतीत कुठलीही तडजोड करणार नाही असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

सैनिकांच्या रक्ताचा थेंबही व्यर्थ जाऊ देणार नाही -शहा
ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या एका कार्यक्रमात शहा पोहोचले होते. याच दरम्यान बोलताना ते म्हणाले, "येथे भारताच्या सुरक्षिततेशी तडजोड केली जाणार नाही. आम्ही आमच्या क्षेत्रात कुठल्याही स्वरुपाचे उल्लंघन खपवून घेणार नाही. आमच्या सैनिकांच्या रक्ताचा एक थेंब देखील वाया जाऊ देणार नाही." याही पुढे बोलताना, सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोट हवाई हल्ल्यांनंतर जगभरात भारताविषयी इतर देशांचा दृष्टीकोन बदलला आहे. जागतिक स्तरावर भारत एक नवीन ताकद म्हणून समोर आला आहे. इतर देशांनी सुद्धा भारताची ताकद मान्य केली. असे गृहमंत्री म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...