आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जे भारत माता की जय बोलतील तेच या देशात राहतील - केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे वक्तव्य

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • देशाला धर्मशाळा बनवायचे आहे का? प्रधान यांनी उपस्थितांना केला सवाल
  • शहीद भगत सिंह, सुभाषचंद्र बोस यांचे बलिदान विसरून चालणार नाही - धर्मेंद्र प्रधान

न्यूज डेस्क - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरातील विविध भागात आंदोलने केली जात आहे. या दरम्यान केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. देशाला धर्मशाळा बनवाये आहे का? जे लोक 'भारत माता की जय' बोलतील, तेच भारतात राहतील' असे वक्तव धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी बोलताना उपस्थितांना प्रश्न विचारला की, तुम्हाला भारताला धर्मशाळा बनवयाचे आहे का? त्यामुळे आम्हाला हे आव्हान स्वीकारावे लागणार आहे. तसेच निश्चित करावे लागेल की, भारतात केवळ तेच लोक राहू शकतात जे 'भारत माता की जय' बोलण्यास तयार आहेत.

धर्मेंद्र प्रधान पुढे बोलताना म्हणाले की, शहीद भगत सिंह, सुभाषचंद्र बोस यांसारख्या महापुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली आहे. त्यांचे बलिदान विसरून चालणार नाही. त्यामुळे या सर्वांचे स्मरण करुन आपल्याला एक निर्णय घेतला पाहिजे की, देशात राहणाऱ्या व्यक्तीला 'भारत माता की जय' म्हणावेच लागेल.