आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कभी खुशी कभी गम' हेच आयुष्याचे चक्र आहे! आर्थिक मंदीवर ऑटो इंडस्ट्रीजला गडकरींचे उपदेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशभर अर्थव्यस्थेत आलेल्या संकटावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी ऑटो इंडस्ट्रीजला उपदेश दिले आहेत. उद्योजकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. ही कठीण वेळ निघून जाईल. सोबतच, "उद्योगात कठिण वेळ सुरू असल्याची मला जाणीव आहे. आम्ही वृद्धीसाठी प्रयत्न करत आहोत. ऑटो सेक्टरशी मी बोललो की कभी खुशी कभी गम हेच आयुष्यातील चक्र आहे. कधी आपण यशस्वी होता, तर कधी अपयश हाती लागतं." असेही गडकरी यावेळी बोलताना दिसून आले आहेत.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मंदीवर बोलण्याची ही पहिली वेळ नाही. गडकरींनी यापूर्वी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) च्या वार्षिक बैठकीत मंदीवर आपले मत व्यक्त केले होते. त्यावेळी बोलताना गडकरी म्हणाले होते, की ऑटो सेक्टरमध्ये सध्या अडचणींचा काळ सुरू आहे. उत्पादक निर्यात वाढवून देशांतर्गत झालेल्या विक्रीची कमतरता भरून काढू शकतात. उद्योगांना भरारी देण्यासाठी सरकारकडून सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत असेही त्यांनी आश्वस्त केले होते.