इंधन दरावर सरकारचे नियंत्रण नाही, आंदोलनाचा अधिकार सर्वांना, पण हिंसाचारासाठी जबाबदार कोण:रवीशंकर प्रसाद
इंधन दरवाढीसाठी भारत सरकार जबाबदार नसून आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांमुळे इंधन दरवाढ होत असल्याचे प्रसाद म्हणाले.
-
केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद.
नवी दिल्ली - काँग्रेससह संपूर्ण विरोधकांनी पुकारलेल्या भारत बंदवरून भाजप नेते आणि केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी टीका केली आहे. सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण हिंसाचार केला जात असून त्यासाठी जबाबदार कोण अशा प्रश्न रवीशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला आहे. तसेच इंधन दरवाढीसाठी भारत सरकार जबाबदार नसून आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांमुळे इंधन दरवाढ होत असल्याचेही रवीशंकर प्रसाद म्हणाले.
काय म्हणाले रवीशंकर प्रसाद
- आंदोलनाचा अधिकार सर्वांना होत आहे, मात्र आज हे काय घडत आहे? पेट्रोल पंप, बस जाळल्या जात आहेत, लोकांचे जीव धोक्यात घातले जात आहेत.
- बिहारच्या जेहानाबादमध्ये अॅम्ब्युलन्सला वाट न मिळाल्यामुळे एका लहानग्याने जीव गमावला, यासाठी जबाबदार कोण?
योगी म्हणाले.. विरोधक वैफल्यग्रस्त
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, विरोधकांना वैफल्य आले आहे. त्यांच्याकडे दुसरी कोणतीही रणनिती नाही, अशावेळी त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार. देव त्यांना सद्बुद्धी देवो एवढेच मी म्हणेन. तसे झालेच तरच त्यांना सकारात्मक आणि नकारात्मक यातील फरक समजेल, अन्यथा भविष्यात ते विरोधकाची खुर्चीही गमावून बसतील.
नक्वी म्हणाले, महाआघाडीचा फुगा फुटणार
केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, भारत बंद नसून तो विकासाच्या मार्गावर आगेकूच करत आहेत. काँग्रेसच्या या भूलथापांना कोणीही बळी पडणार नाही. तसेच महाआघाडीचा फुगाही लवकरच फुटणार असल्याचेही नक्वी म्हणाले. -
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, विरोधकांना वैफल्य आले आहे. त्यांच्याकडे दुसरी कोणतीही रणनिती नाही, अशावेळी त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार.
-
केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी.
केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, भारत बंद नसून तो विकासाच्या मार्गावर आगेकूच करत आहेत. महाआघाडीचा फुगाही लवकरच फुटणार असल्याचेही नक्वी म्हणाले.
More From National News
- उद्घाटनानंतर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये बिघाड; चमरौला रेल्वेस्थानकाजवळ एका प्राण्याची गाडीला धडक
- 40 शहीद जवानांवर अंत्यसंस्कार, देशात संताप; शहिदांच्या अंत्ययात्रेत 16 राज्यांतून 20 ते 25 लाख नागरिक जमले, हातात तिरंगा, शहीद अमर रहेच्या घोषणा
- पठाणकोटपासून पुलवामापर्यंतच्या हल्ल्यांचा इशारा आधीच दिला असतानाही जवान हुतात्मा का होताहेत?