आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'इंडियाज ग्रेटेस्ट ब्रँड अँड लिडर्स अवॉर्ड'ने सन्मानित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रिपब्लिकन पार्टी इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना ‘इंडियाज ग्रेटेस्ट ब्रँड अँड लिडर्स अवॉर्ड’ने गौरवण्यात आले आहे. स्वतः आठवलेंनी आपल्या ट्विटर हँडलवर फोटो शेअर करत या पुरस्काराविषयी माहिती दिली आहे.एशियन बिझनेस आणि सोशल फोरमचे बारावे अधिवेशन नुकतेच मुंबईतील वांद्रे परिसरातील ताज लँड एन्डमध्ये आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात रामदास आठवले यांचा ‘इंडियाज ग्रेटेस्ट ब्रँड अँड लिडर्स अवॉर्ड’ने सन्मान करण्यात आला. यावेळी जगभरातील उद्योजक आणि समाजसेवक उपस्थित होते.

युनायटेड अरब अमिरतमधील शारजाचे प्रसिद्ध उद्योगपती सौद सलीम अल मझरोकी, मुंबई स्टॉक एक्स्चेंजचे सीईओ आशिषकुमार चौहान, उद्योजक बी आर शेट्टी, विकासक निरंजन हिरानंदानी या मान्यवरांनाही रामदास आठवले यांच्या हस्ते गौरवण्यात आले. दरम्यान, आठवले यांचा सन्मान झालेला असला, तरी त्यांचे नेमके योगदान काय, हे गुलदस्त्यातच आहे.

बातम्या आणखी आहेत...