आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमर-अकबर-अँथनीचा संसार चांगला चालवा, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची महाविकास आघाडीवरून टोलेबाजी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - राष्ट्रवादीचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा जालन्यात सर्वपक्षीय नागरिक सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अमर-अकबर-अँथनिचा संसार चांगला चालावा असे म्हणत महाविकास आघाडीवरुन चांगलीच टोलेबाजी केली. आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाहीत, मात्र तुम्ही डिस्टर्ब होऊ नका 

रावसाहेब दानवे बोलताना म्हणाले की, तुमचा अमर अकबर अँथनिचा संसार चांगला चालवा,  नाहीतर अर्ध्यावरच डाव मोडायचा. आम्हाला पुन्हा संधी देवू नका, तुमचा सारा खेळ खेळून घ्या. आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाहीत. मात्र तुम्ही डिस्टर्ब होऊ नका. असे म्हणत दानवेंनी महाविकास आघाडीला चिमटे काढले. जसा बॉल आला तसा टोलवावा लागतो

पुढे बोलताना ते म्हणाले की, पिक्चर, क्रिकेट आणि राजकारणात सर्वांनाच यावं वाटतं. पण पिक्चरमध्ये रिटेक घेता येतो. क्रिकेटमध्ये सराव होतो मात्र राजकारणात एकदा संधी सुटली तर विषय संपला. जसा चेंडू आला तसा टोलावा लागतो. 

बातम्या आणखी आहेत...