आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Union Minister's Car Left Without Penalty; Three Policemen With SI Suspended In Bihar

केंद्रीय मंत्र्यांची गाडी कारवाई न करता सोडली; एसआयसह तीन पोलिस कर्मचाऱ्यांना केले निलंबित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांचा मुलागा आणि सून - Divya Marathi
केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांचा मुलागा आणि सून

पाटणा -  पाटण्यात वाहन तपासणी दरम्यान रविवारी केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांची कार कारवाई न करता सोडल्यामुळे एसआय सह तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. तर काही वेळानंतर खासदार रामकृपाल यादव यांच्या कारमध्ये काळी फिल्म लावल्याचे आढल्यावर पोलिसांनी एक हजार रुपयांचा दंड वसूल केला. या दोन्ही नेत्यांच्या गाडीत त्यांचा मुलगा आणि कुटुंब होते. 

रविवारी बिहार म्युझियमसजवळ सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत विशेष तपास अभियान राबवण्यात आले. दरम्यान पोलिसांनी दुपारी एक वाजता केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांची गाडी थांबवली. पुढील सीटवर त्यांचा मुलगा आणि सून सिट बेल्ट न लावता बसले होते. तर मागील सिट वर त्यांच्या पत्नी बसल्या होत्या. मंत्र्याच्या मुलाने गाडीला बिहरा म्युझियमच्या गेटपासून 100 मीटर पुढे दूर थांबवली. दरम्यान पोलिसांनी कारवाई करण्याचे सोडून अर्धा तास तेथे रोखून धरले होते. 

मंत्र्याचे कुटुंब पोलिस कारवाईची पाहत होते वाट 
काही वेळ कारवाईची वाट पाहिल्यानंतर मंत्र्याचा मुलगा गाडी घेऊन निघून गेला. याची माहिती विभागीय आयुक्तांना मिळताच त्यांनी नोकरीवेळी उपस्थित असलेले एसआय देवपाल पासवान, बीएमपी-2 चे शिपाई पप्पू कुमार आणि जिल्हा पोलिसचे शिपाई दिलीपचंद्र सिंह यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले. 

कार्यवाहीच्या भितीने खासदाराची कार पाहून पुन्हा केली नाही चूक
या दरम्यान सदरील मार्गावरून जाणाऱ्या खासदार रामकृपाल यादव यांच्या गाडीवर काळी फिल्म लावलेली होती. गाडीत त्यांचा मुलगा सीट बेल्ट न लावता बसलेला होता. कारवाई होत असलेली पाहून पोलिक कर्मचाऱ्यांनी यावेळी चूक केली नाही. खासदारांच्या गाडीवर कारवाई करत एक हजार रुपयांचा दंड वसूल केला. 

नवीन नियमांतर्गत होत आहे तपासणी 
विभागीय आयुक्त आनंद किशोर यांनी सांगितले की, नवीन वाहतून नियमांतर्गत वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. कोणलाही वाहतुकीचे नियम तोडण्याची सूट देण्यात आली नाही. नियम तोडणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल. यामध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांविरोधातही कारवाई करण्यात येणार आहे.