आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींना सॅनिटरी नॅपकिन देऊन अनोखे कुमारिका पूजन, बक्षी, रासपायले कुटुंबीयांचा पुढाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - नवरात्रोत्सवात सर्वत्र स्त्रीशक्तीचा जागर सुरू आहे. नवमीच्या दिवशी कुमारिका पूजन करून देवीची आराधना केली जाते. फक्त पूजन किंवा त्यांना शृंगाराचे साहित्य देऊन कुमारिका पूजन करण्यापेक्षा काही सामाजिक उद्देश सफल व्हावा, या विचाराने बक्षी आणि रासपायले कुटुंबीयांनी यंदा अकोला येथील महापालिकेची शाळा आणि पदवीच्या व ४० मुलींना सॅनिटरी नॅपकिन आणि अंतर्वस्त्र देऊन आगळेवेगळे कुमारिका पूजन केले. 

 

या वेळी मुंबईतील एका खासगी कंपनीतील व्यवस्थापन अधिकारी आशिष बक्षी यांनी इयत्ता नववी व दहावीच्या मुलींसोबत "स्त्रीशक्ती'या विषयावर संवाद साधला. आपल्याला मदत करणारे समाजात अनेक जण आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या मदतीचा विसर न पडू देता, भविष्यात अशाच गरजू विद्यार्थ्यांना मदत करून एका अर्थाने परतफेड करता येईल, असे त्यांनी सांगितले. मायबोली क्लासेसच्या संचालिका सीमा बक्षी यांनी मुलींना मासिक पाळी आणि वैयक्तिक स्वच्छता याविषयी मार्गदर्शन केले. या सोहळ्यात महापालिका शाळा क्रमांक २६ मधील इयत्ता नववी, दहावी आणि बीकॉम प्रथम वर्षातील अशा ४० विद्यार्थिनींचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने कुमारिका पूजन करून नवरात्रोत्सव साजरा केला. यात मायबोली कोचिंग क्लासेसचे सीमा बक्षी व नितीन बक्षी यांच्यातर्फे मुलींना वर्षभर पुरतील एवढे सॅनिटरी नॅपकिन, बंगळुरू येथील सायली रासपायले व आलोक रासपायले यांनी दोन जोड अंतर्वस्त्र दिले. तर आशिष बक्षी यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींना मराठी, हिंदी, इतिहास व भूगोल असे चार गाइड देण्यात आले. याशिवाय फराळाचा आस्वाददेखील मुलींनी घेतला. या सोहळ्याला मायबोली कोचिंग क्लासेसचे संचालक नितीन बक्षी, प्रेम तिवारी आदी उपस्थित होते. 

अकोल्याच्या मनपाच्या शाळेतील विद्यार्थींनीना वाटण्यात आलेले सॅनिटरी नॅपकीन. 

 

दहावीची विद्यार्थीनी घेतली पुढील शिक्षणासाठी दत्तक 
दैनिक दिव्य मराठी, मायबोली कोचिंग क्लासेस, प्रभात किड्स स्कूल, रेडक्रॉस सोसायटी, रेणुका माता मित्रमंडळ यांच्या वतीने मागील ३ वर्षांपासून सुरू असलेल्या मिशन-२६ मधील इयत्ता दहावीतील महिमा खंडारे हिच्या दहावीनंतरच्या शिक्षणासाठी पालकत्व मुंबई येथील आशिष बक्षी यांनी स्वीकारले आहे. 

बातम्या आणखी आहेत...