आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनईच्या सुरात शेततळ्यात बांधल्या रेशीमगाठी, शेततळ्यातील होडीतच हळद लागली

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गिरीश भगत

लोहारा - एकरभरातील  शेततळ्याच्या मध्यभागी सजलेल्या होडीत बसून नवरा-नवरी हळद लावतात. सायंकाळी गोरज मुहूर्तावर सनई-चौघड्याचे मधूर सूर कानी पडतात आणि शेततळ्यातच शेतकरीपुत्राचा अनोख्या पध्दतीने आकर्षक विद्युत रोषणाईच्या झगमगाटात विवाह संपन्न होतो. तळ्याच्या चहूबाजूंनी वऱ्हाडी मंडळी अक्षता म्हणून चुरमुरे टाकतात आणि तळ्यातील मासे त्याचे सेवन करतात. लोहारा तालुक्यातील आरणीमध्ये हा अनोखा विवाहसोहळा नुकताच पार पडला.आरणी येथील बळवंत दत्तात्रय थिटे यांचा मुलगा वंदन थिटे याचा विवाह ६ महिन्यांपूर्वी तालुक्यातील कानेगाव येथील दीपा राम कदम यांच्याशी ठरला. आपल्या मुलाचा विवाह अनोख्या पद्धतीने करण्याचा विचार असताना त्यांना शेततळ्यातच विवाह करण्याची कल्पना सुचली.   थिटे यांनी आपल्या पुतण्याच्या व गावकऱ्यांच्या मदतीने तलावाभोवती आकर्षक विद्युत रोषणाई, सजावट केली. हळदीचा कार्यक्रमही शेततळ्यातच झाला. लग्नघटिका जवळ आल्यानंतर सर्व नातेवाईकांना शेततळ्याच्या बाजूने उभे करण्यात आले. सायंकाळी ६.४५ च्या सुमारास नवरदेव, नवरी, काही मंडळी होडीने शेततळ्यात गेले. त्यानंतर रीतसर विवाह पार पडला.   अक्षदांऐवजी चुरमुरे वापरले गेले. हे चुरमुरे तलावातील मास्यांसाठी खाद्य ठरले. बातम्या आणखी आहेत...