Home | National | Gujarat | Unique marriage one groom with two bride to marry

लग्नमंडपात दोन वधूंसोबत सात फेरे घेणार नवरदेव, 3 मुले बनणार वऱ्हाडी; लग्नपत्रिका अशी की वाचणारे लोक आहेत हैराण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 14, 2019, 03:04 PM IST

लग्नासाठी दोन्ही महिला तयार, एक नोकरी करते तर दूसरी घर सांभाळते

 • Unique marriage one groom with two bride to marry

  वापी (गुजरात) - दक्षिण गुजरातमध्ये प्रथमच एक पुरुष दोन महिलांसोबत लग्न करणार आहे. 22 एप्रिल रोजी पालघर येथे हा आगळावेगळा विवाह पार पडणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे लग्नापूर्वी यांना तीन मुले आहेत. एक वधू वापी येथील कंपनीत नोकरीला आहे. तर दूसरी घर सांभाळते. लग्नपत्रिकेत दोन वधूंचे नाव पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

  प्रेम प्रसंग आणि अनोख्या लग्नाची गोष्ट काहीशी या प्रकारची आहे

  पालघर येथील संजय धागडा अनाथ आहे. तो रिक्षा चालवतो. संजयची 10 वर्षांपूर्वी बेबी या युवतीसोबत भेट झाली. दोघांना एकमेकांवर प्रेम झाले आणि लग्न न करता सोबत राहू लागले. 2011 साली संजय वापी येथील एका कंपनीत नोकरी करणारी त्याची शालेय मैत्रिण रीनावर जीव जडली. संजयला लग्नपूर्वी बेबी आणि रीनापासून तीन मुले आहेत. मुले मोठे होत असताना तिघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता संजय 22 एप्रिल रोजी पालघरच्या वासा सुतारपाड येथे बेबी आणि रीनासोबत लग्न करणार आहे. वलसाड येथे या लग्नाबाबत बरीच चर्चा होत आहे. संजयच्या लग्नाच्या पत्रिका देखील वाटण्यात येत आहेत.


  लोकांनी मुलांना टोमणे मारू नये म्हणून करतोय लग्न - संजय

  संजयने सांगितले की, माझे तिन्ही मुलांचे शिक्षण सुरू आहे. शाळेचे रजिस्टर आणि इतर दस्तावेजांमध्ये तोच मुलांचा पिता आहे. लोकांनी माझ्या मुलांना टोमणे मारू नये यामुळे मी सोबतच दोघींनी लग्न करत आहे. तर दुसरीकडे या लग्नामुळे आम्ही आनंदी असल्याचे दोन्ही युवतींचे म्हणणे आहे. याप्रकरणाबाबत पोलिसांचे म्हणणे आहे की, आदिवासी समाजात अशाप्रकारच्या घटना घडत असतात. एक पुरूष दोन महिलांसोबत विवाह करण्याची त्यांची परंपरा आहे.


  कपराडा-धरमपूर भागात मुले झाल्यानंतरही करतात लग्न

  धरमपूर आणि कपराडा येथील आदिवासी समुदाय मुले झाल्यानंतर लग्न करतात. याचे मुख्य कारण म्हणजे पैशांचा कमतरता असल्यामुळे ते लग्न न करता पती-पत्नी सारखे एकत्र राहतात. परिस्थिती सुधारल्यानंतर समाजसमोर लग्न करतात.

Trending