आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनोखे रेस्तरॉ, जिथे खाण्याबरोबरच पेडीक्युअरदेखील केले जाते   

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

इंडोनेशियाची सांस्कृतिक राजधानी योग्यकर्तामध्ये एक असे रेस्तरॉ आहे. जिथे जेवण करण्यासोबतच फिश स्पाचाही आनंदघेऊ शकतात. रेस्तरॉंचे नाव सोटो कॉकरो केमबेंग आहे. हे इंडोनेशियाच्या पारंपरिक जेवणासाठी प्रसिद्ध आहे. रेस्तरॉ बागेच्या मधोमध बनवले गेले आहे. दावा आहे की, येथील वातावरण लोकांचा तणाव दूर करण्यात मदत करते. 

ग्राहकांना आवडत आहे रेस्तरॉमधील फिश पेडीक्युअरची आयडिया... 


रेस्तरॉचा मालक इमाम नूर म्हणतो, रेस्तरॉची सुरुवात मागच्या वर्षी झाली आहे. येथे ग्राहक सुंदरता पाहण्याबरोबरच ट्रॅडिशनल फूडदेखील एन्जॉय करतात. बातम्यांमध्ये याचा उल्लेख होतो, सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल होत असतात. हे लोकांना एवढे आवडेल याची आम्हाला अपेक्षा नव्हती. 


इमाम नूर यांच्यानुसार, रेस्तरॉची सुरुवात स्थानिक लोकांसाठी केली गेली होती, पण आता हे कलनरी टुरिझमसारखे झाले आहे. इंडोनेशिया व्यतिरिक्त इतर देशांमधूनही लोक येथे येतात. जेवण करताना पाय पाण्यात बुडवून बसणे त्यांना आवडते आहे. फिश स्पा पेडीक्युअरसारखे काम करत आहे. या वैशिष्ठ्याने या छोट्याश्या रेस्तरॉला खूप प्रसिद्धी मिळवून दिली आहे.  


हे रेस्तरॉ एकेकाळी गायीचा गोठा होते. याला इमामचे पिता इमान नूर यांनी माश्यांच्या पूलमध्ये रूपांतरित केले होते. यामध्ये 7 हजार लाल मासोळ्या टाकल्या. रेस्तरॉचा अनुभव सांगताना एक ग्राहक सुसंतों म्हणाला की, येथे माश्यांचे पायाला स्पर्श करणे आणि पायांशी खेळणे खूप आवडले. 


मागील काही वर्षांमध्ये फिश पेडिक्युअर खूप वादात होते. यूरोप आणि उत्तर अमेरिकेतील काही शहरांमध्ये फिश पेडिक्युअर घेतल्यानंतर बॅक्टेरीयल इंफेक्शनचा प्रकार समोर आला होता. एक प्रकरण असेही होते की, गंभीर संक्रमण झाल्यानंतर महिलेचा पायसुद्धा कापावा लागला होता. 

बातम्या आणखी आहेत...