आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमधील गवळवाडीच्या भिंतींवर शोभतोय तिरंगा, प्रतिज्ञा, बाराखडी अन् महापुरुषांचे विचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- भिंतींवर रंगवलेला तिरंगा,भिंतींवर चितारलेले राष्ट्रगीत अन् प्रतिज्ञा... माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्यासह शहीद अाणि अाॅलिम्पिक विजेत्यांची लक्षवेधी चित्रे... भिंती-भिंतींवर लिहिलेले सुविचार, बालगीते, कविता अाणि गणितातील पाढे, सूत्र अन बाराखडी... हे चित्र आहे नाशिक जिल्ह्यातील गवळवाडी या अादिवासी पाड्यातले. विद्यार्थ्यांना रस्त्याने येता-जाता शिक्षण मिळावे अाणि त्यांच्यातील देशप्रेमाची भावना अधिक दृढ व्हावी या उद्देशाने काही तरुण अभियंत्यांनी एकत्र येऊन एज्युक्वाॅइन संस्थेच्या माध्यमातून या गावाचा कायापालट केला अाहे. 


शाळेमधली घाेकंपट्टी अन् मर्यादित सामग्री यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या बाबतीत काहीसे मागे राहत असल्याची बाब एज्युक्वाॅइनच्या सदस्यांच्या लक्षात अाली. त्यांनी अापापसात चर्चा करून गावाचा शाेध सुरू केला. नाशिकपासून १४  किलाेमीटरवर असलेल्या गवळवाडीत या तरुणांचा शाेध थांबला. एक हजार लाेकवस्तीच्या या पाड्यात पहिली ते चाैथीपर्यंतची शाळा अाहे. मात्र, चाैथीनंतर विद्यार्थ्यांना सहा ते सात किलाेमीटरवरील अाशेवाडीत जावे लागते. जिल्हा परिषदेच्या वतीने शाळेसाठी सामग्री पुरवली जाते. 


मात्र, दरवर्षी तीच ती 
सामग्री असल्याने विद्यार्थीही कंटाळून तिच्याकडे पाठ फिरवत अाहेत. अशात विद्यार्थ्यांची शिक्षणविषयक गाेडी टिकून राहावी, किंबहुना ती वाढावी या उद्देशाने एज्युक्वाॅइन संस्थेच्या वतीने गावातील भिंतींवर अाकर्षकरीत्या माहिती रेखाटण्यात अाली अाहे. बऱ्याच मुलांकडे शालेय पुस्तके नसतात, मुले गप्पांमध्ये शिक्षणाचे विषयच घेत नाहीत, या बाबी प्रकर्षाने फाउंडेशनला जाणवल्या. त्यातून गवळवाडीच्या भिंती चितारण्याची संकल्पना पुढे अाली.


काय रंगवले भिंतींवर?  
राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, वंदे मातरम्, महापुरुषांची माहिती, शहिदांची सचित्र माहिती, अाॅलिम्पिक विजेत्या खेळाडूंची चित्रे, उजळणी, पाढे, बाराखडी, इंग्रजी वर्णाक्षरे, पारिभाषिक शब्द, कविता, मराठी व इंग्रजी महिने, ऋतू, दिवस यांची माहिती, इंग्रजी शब्दांचे मराठीतील उच्चार, इंग्रजी अाणि मराठीतील शिष्टाचाराचे शब्द, सुविचार, रंग अाणि अाकारांची माहिती, नाते -संबंधांची इंग्रजी व मराठीतील अाेळख, जगप्रसिद्ध महाकवींची माहिती, सामान्यज्ञान वाढवणारी माहिती.


१५ ऑगस्टला उद््घाटन
- ग्रामस्थ महेश बनछोडे म्हणाले, मुले भिंती वाचत-वाचतच शाळेत जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली अाहे. 
- एज्युक्वाॅइनचे निखिल ढगे व हेमंत कोठुळे म्हणाले, शहिदांच्या कुटुंबीयांच्या हस्ते १५ अाॅगस्टला उपक्रमाचे उद्घाटन हाेणार अाहे. अागामी काळात उर्वरित भिंतींवर अाणखी काही प्रयाेग केले जाणार अाहेत. अामचे बघून शेजारच्या एका गावानेही असा उपक्रम राबवण्याचा संकल्प केला अाहे. यासाठीचा खर्च अाम्हीच केला.


१२ शाळांत ग्रंथालय  
पीव्हीजी अभियांत्रिकीतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन तीन वर्षांपूर्वी एज्युक्वाॅइन फाऊंडेशनची सुरुवात केली. स्वत:च्या खिशातील  निधी जमा करून त्यात जिल्ह्यातील शाळांचा विकास करणे हे फाउंडेशनचे प्रमुख काम अाहे. जिल्हा परिषदेच्या १२ शाळांमध्ये ‘विद्याधन ग्रंथालय’ सुरू करण्यात अाले असून प्रत्येक शाळेत शंभर पुस्तके अाणि ग्रंथालयासाठी अावश्यक असलेली सामग्री फाउंडेशनच्या वतीने पुरवण्यात येते. २६ जानेवारी २०१९ पर्यंत २७ शाळांपर्यंत हा उपक्रम पाेहोचवला जाणार अाहे.

 

बातम्या आणखी आहेत...