आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदयपूरमध्ये आयोजित विद्यापीठस्तरीय अखिल भारतीय बॉक्सिंग स्पर्धा, बंधने झुगारून महिला बॉक्सर्सची आगेकूच 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर | येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेत देशभरातील सुमारे १ हजार महिला बॉक्सर्सनी सहभाग घेतला. यात परिस्थितीशी झगडून, अडचणींवर मात करत या क्षेत्रात उतरलेल्या अनेक बॉक्सर होत्या. त्यातल्या त्यात या दोघींची कहाणी अत्यंत प्रेरणादायी आहे. ही कहाणी त्यांच्याच शब्दांत...

 

मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांशी लढण्यासाठी... 
मादरे डी सूजना वय : १९ वर्षे आंध्र विद्यापीठ 

- सहा वर्षांपूर्वीची घटना आहे. मी नववीत होते. माझ्या एका मैत्रिणीवर अत्याचार झाला. या घटनेनंतर मी इतकी घाबरले की घरातून बाहेर पडण्याची हिंमतच होत नव्हती. या स्थितीतच मी माझ्या मैत्रिणीवर अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध लढण्याचे ठरवले. बॉक्सिंगचे धडे घेऊ लागले. आमचे कुटुंब मोलमजुरी करणारे होते. पैशाचा तुटवडा होता तरी मी रोज मन लावून सराव करू लागले. या जिद्दीतूनच मी आज राष्ट्रीय पातळीवर बॉक्सर होऊ शकले. 
 
बॉक्सिंगमुळे आजोबा गेले, भाऊ अजून कोमात आहे... 
रुची वय १८, उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद 

- माझे आजोबा बॉक्सर होते. एका लढतीत त्यांना दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. यानंतर वडिलांनी, त्यांच्यानंतर भावाने बॉक्सिंगचे धडे घेतले. दोन वर्षांपूर्वी भावाच्या डोक्याला मार लागला. तो अजूनही कोमात आहे. या घटनेनंतर संपूर्ण कुटंुब धास्तावलेले आहे. मी बॉक्सिंगचा सराव करायचे तेव्हा कुटुंबातून खूप विरोध झाला. अाज मी उदयपूरला बॉक्सिंग स्पर्धेसाठी आल्याचे अजूनही कुटुंबातील कुणाला मुद्दाम सांगितले नव्हते. 

 

मुलगी म्हणून सुरुवातीला प्रशिक्षकाने शिकवले नाही 
एम. मनासा वय : १९ वर्षे, वारंगल विद्यापीठ 

- मी ज्या भागात राहते तेथे कोळसा खाणींशिवाय दुसरे काहीही नाही. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. वडील किक बॉक्सर होते, पण राज्यस्तराच्या पुढे ते जाऊ शकले नाहीत. जवळ असलेल्या प्रशिक्षकांकडे बॉक्सिंग शिकण्यासाठी ते पाठवायचे, परंतु काही प्रशिक्षकांनी मुलगी म्हणून तर काहींनी कमकुवत ठरवत बॉक्सिंग शिकवण्यास मनाई केली. तरी वडिलांनी स्वत: प्रशिक्षण दिले. दिवस-रात्र मी बॉक्सिंगचा सराव करत होते. 
शब्दांकन : निखिल शर्मा, उदयपूर 
 

 

बातम्या आणखी आहेत...