आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Universities Doing Research On Future Food, Bananas Will Double Vitamins, Fish Will Be Made Without Water

भविष्यातील भोजन कसे असेल? केळ्यात दुप्पट होईल व्हिटॅमिन, पाण्याविना तयार होतील मासे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात १ ते ७ सप्टेंबरपर्यंत राष्ट्रीय पोषण आठवडा साजरा करण्यात आला. भोजन आणखी पौष्टिक बनवण्यासाठी प्रख्यात विद्यापीठे काम करत आहेत. पुढील पाच-दहा वर्षांत मोठ्या स्तरावर येणार असलेल्या भोजनाबाबत जाणून घेऊया.  

उत्पादन वाढीसाठी मिरचीप्रमाणे तिखट टोमॅटो
हा टोमॅटो हिरव्या मिरचीसारखा तिखट असेल. टोमॅटोत कॅपसायसिनॉइड्स असते, हा घटक मिरचीला तिखट बनवतो. वैज्ञानिक त्याला जीन एडिटिंगच्या मदतीने टोमॅटोत सक्रिय करत आहेत. ब्राझीलच्या फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ विकासाचे संशोधक अगस्टिन सोगोन सांगतात की, कॅपसायसिनॉइड्स वजन घटवण्यासाठीही मदत करते. मिरचीच्या तुलनेत टोमॅटो मोठ्या प्रमाणावर घेणे सोपे असते.
 
> केव्हा येईल? : 2019 अखेरीस हे टोमॅटो घेतले जातील.
> कोण आणेल? : 02 देश ब्राझील आणि आयर्लंड काम करत आहेत. 
 

व्हिटॅमिन-ए दुप्पट असलेली केळी
ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीने असे केळ विकसित केले आहे, ज्यात व्हिटॅमिन-एचे प्रमाण सामान्य केळ्यापेक्षा दुप्पट असेल. अशा केळी पापुआ न्यू गिनीत आढळतात, याच केळ्याचे जीन्स घेऊन वैज्ञानिक ते तयार करत आहे. गेट्स फाउंडेशन निधी देत आहे.
> 7 लाख पेक्षा जास्त मुलांचा मृत्यू दरवर्षी जगभरात व्हिटॅमिन-एच्या अभावामुळे होतो.
> केव्हापर्यंत येईल? : 2025 पर्यंत
 

सीफूड बनवणार पण लॅबमध्ये
अमेरिकेची कंपनी ब्लनालू आणि फिनलेस फूड्स सेल बेस्ट सीफूडवर काम करत आहे. म्हणजे विशेष मासा किंवा जलीय जीवापासून पेशी घेतील आणि ते लॅबमध्ये विकसित करतील.

विशेष गोष्ट म्हणजे  या सी फूडमध्ये डोके, पाय, हाडासारख्या गोष्टी नसतील. ते प्लास्टिकच्या शीटसारखे असेल.

> केव्हापर्यंत येईल? : त्याबाबत कंपनीने सध्या काही सांगितले नाही.
 

कापल्यानंतरही फिकट न होणारे सफरचंद
सफरचंदाबाबत सर्वात मोठी समस्या अशी की, ते कापल्यानंतर त्वरित खाल्ले नाही तर ते काळे किंवा फिकट पडू लागते. जगात त्यामुळे मोठ्या प्रमाणात सफरचंदाची बरबादी होते. कापल्यानंतरही फिकट होत नाही असे सफरचंद कॅनडाच्या ओकानागन कंपनीने तयार केले आहे.
 
> केव्हापर्यंत येईल? : सध्या ते अमेरिकेत उपलब्ध आहे. युरोपमध्येही त्याला मंजुरी मिळण्याची चर्चा सुरू आहे. ते एक-दोन वर्षांत युरोपियन आणि इतर बाजारांतही उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
 

लॅबमध्ये तयार होईल मांस, पर्यावरणही वाचेल 
जगात अनेक स्टार्टअप सध्या लॅबमध्ये मांस तयार करण्यावर काम करत आहेत. ब्रिटनच्या अॅडम स्मिथ इन्स्टिट्यूटचे संशोधक डॉ. मॅडसन पायरी म्हणाले की, त्यामुळे होणारे ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन ७८ ते ९६ टक्के कमी होईल. जमिनीचा वापरही ९९ टक्के कमी होईल. अलीकडेच भारतातही आयआयटी गुवाहाटीत लॅबमध्ये मांस तयार करण्यात आले आहे. हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजी आणि नॅशनल रिसर्च सेंटर ऑन मीटही स्टेम सेलच्या मदतीने मांस उत्पादनावर काम करत आहे. 
 
> २०१३ मध्ये नेदरलँड्सच्या मॅसट्रिच्ट युनिव्हर्सिटीने प्रथमच लॅबमध्ये बर्गर बनवले. या वर्षापर्यंत विदेशात त्याचे दर खूप कमी होतील.
 
 

बातम्या आणखी आहेत...