आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजित पवारांच्या स्वीय सहायकाच्या भावावर अज्ञाताचा प्राणघातक हल्ला

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पुणे - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक व अतिरिक्त जिल्हाधिकारी गजानन पाटील यांचे बंधू आनंदराव पाटील (५५) यांच्यावर ते शेतात जात असताना रविवारी अज्ञात मोटारसायकलस्वार व्यक्तीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आनंदराव खटाव (ता. पलूस) येथील माजी सरपंच असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. ही घटना रविवारी दुपारी बाराच्या सुमारास खटाव-माळवाडी रस्त्यालगत घडली. आनंदराव पाटील हे तासगाव येथील रामानंद सूतगिरणीचे संचालकही आहेत.आनंदराव पाटील यांच्यावर झालेल्या या प्राणघातक हल्ल्याची गावात पुसटशीही कल्पना नव्हती. हल्लेखोर बाहेरचे असल्याची या वेळी चर्चा होती. हल्ल्याची माहिती मिळताच गावात शांतता पसरली. याबाबत अधिक तपास भिलवडी पोलिस करत आहेत.