महाभारत / किती दिवस चालले महाभारत युद्ध, कोणत्या दिवशी झाला होता शकुनीचा वध

शकुनी कोणत्या देशाचा राजा होता, मुलाचे आणि पत्नीचे नाव काय होते, कुरुक्षेत्रावर कोणी केला त्याचा वध?

रिलिजन डेस्क

Oct 09,2019 12:15:00 AM IST

शकुनी महाभारताच्या प्रमुख पात्रांमधील एक आहे. शकुनी गांधार साम्राज्याचा राजा होता. हे ठिकाण वर्तमानात अफगाणिस्तानमध्ये आहे. शकुनी गांधारीचा भाऊ होता. दुर्योधनाच्या कुटील कारस्थानामागे शकुनीची बुद्धी होती. महाभारत युद्धामागे शकुनीच कारणीभूत होता असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. शकुनीने अनेकवेळा पांडवांसोबत कपट केले आणि भाचा दुर्योधनला पांडवांविरुद्ध भडकवत राहिला. कौरव आणि पांडवांमध्ये झालेल्या द्यूतक्रीडेमध्ये शकुनीच मुख्य करविता होता. आज आम्ही तुम्हाला शकुनीशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत.


1. महाभारतानुसार शकुनीच्या वडिलांचे नाव राजा सुबल आणि आईचे नाव सुदर्मा होते. राजा सुबल गांधार (वर्तमान अफगाणिस्तान)चे राजा होते.


2. शकुनीच्या पत्नीचे नाव आरशी आणि मुलाचे नाव उलूक होते. उलूकनेच युद्धापूर्वी कौरवांचा संदेश पांडवांना ऐकवला होता.


3. युद्धामध्ये सहदेवने विरतापुर्वक युद्ध करत शकुनी आणि उलूक या दोघांनाही जखमी केले आणि यामध्ये उलूकचा मृत्यू झाला.


4. आपल्या मुलाचा मृतदेह पाहून शकुनीला खूप दुःख झाले आणि तो युद्ध सोडून पळू लागला. सहदेवने शकुनीचा पाठलाग करून त्याला पकडले.


5. जखमी असूनही शकुनीने खूपवेळ युद्ध केले परंतु शेवटी सहदेवच्या हातून त्याचा मृत्यू झाला.


6. सहदेवाने शकुनीचा वध युद्धाच्या 18 व्या दिवशी केला होता. शकुनीच्या इतर भाऊही युद्धामध्ये लढले. त्यांचा वध अर्जुनाने केला होता.

X