आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

 ...म्हणून हेलन करणार होत्या आत्महत्या, घटस्फोट घेतल्यानंतर अशी झाली होती सलीम खानच्या आयुष्यात एन्ट्री, वाचा रंजक स्टोरी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये आयटम नंबरसाठी ओळखल्या जाणा-या प्रसिद्ध अभिनेत्री हेलन यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 81 वर्षे पूर्ण केली आहेत. हेलन यांनी त्यांच्या करियरची सुरुवात 'हावडा ब्रिज' या चित्रपटातून केली होती. त्यांनी इंडस्ट्रीमध्ये जवळपास 500 पेक्षा जास्त फिल्म केल्या आहेत. इमान धरम, डॉन, दोस्ताना, शोले या चित्रपटांमधील त्यांच्यावर चित्रीत झालेले आयटम नंबर आजही लोकप्रिय आहेत. हेलन या सलमान खानच्या सावत्र आई असल्याचे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. 1981 मध्ये सलीम खान यांनी हेलन यांच्यासोबत दुसरे लग्न केले होते. पण सलीम खान विवाहित आणि चार मुलांचे वडील असूनदेखील त्यांनी हेलन यांच्यासोबत दुसरे लग्न का केले, याविषयी ब-याच जणांना ठाऊक नसावे. 

चला तर मग जाणून घेऊयात, हेलन सलमानच्या सावत्र आई कशा झाल्या, यामागची संपूर्ण कहाणी....

  • अशा आल्या भारतात...

हेलन यांचे पूर्ण नाव हेलन रिचर्डसन खान आहे. त्यांचा जन्म म्यनमार येथे 21 ऑक्टोबर 1938 रोजी झाला. दुस-या महायुद्धानंतर हेलन आणि त्यांचे कुटुंबीय मुंबईत स्थायिक झाले. हेलन यांचे वडील एंग्लो-इंडियन होते. दुस-या महायुद्धात त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या आईने म्यनमार येथून भारतात येण्याचे ठरवले. त्यावेळी हेलन या तीन वर्षांच्या होत्या. म्यनमारहून भारतात येण्यासाठी त्यांना तब्बल नऊ महिने प्रवास करावा लागल्याचे हेलन यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. हेलन यांच्या आईचे नाव बर्मीज होते. त्या नर्स म्हणून काम करायच्या. हेलन यांचे कुटुंब सर्वात पहिले आसाम येथे पोहोचले. त्यानंतर त्या कोलकाता येथे राहू लागल्या. घराची आर्थिक परिस्थिती ठिक नसल्यामुळे हेलन यांनी आपले शालेय शिक्षण अर्धवटच सोडून दिले. मात्र त्यांनी मणिपुरी, भरतनाट्यम, कथ्थक नृत्याचे रितसर शिक्षण घेतले. घरी पैशांची चणचण असल्याने प्रसिद्ध नृत्यांगना कुक्कूने हेलन यांना सिनेमांमध्ये डान्स करण्याचा सल्ला दिला. कुक्कूच्या मदतीनेच हेलन यांचे बॉलिवूड करिअर सुरू झालं. हेलन यांनी सुरूवातीला ग्रुप डान्समध्ये डान्स केला.

  • दिग्दर्शकासोबत केले होते लग्न...

'रेल का डिब्बा' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान हेलन यांची भेट चित्रपट दिग्दर्शक पी.एन. अरोरा यांच्याशी झाली. या दोघांच्या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात होऊ लागले. या दोघांनी सितारा, अनजाना, हलाकू, खजांची, दो भाई, अली बाबा अलादीन, दिल दौलत और दुनिया यांसारख्या सिनेमांत एकत्र काम केले. हेलन यांनी 1957 साली पीएन अरोरा यांच्याशी लग्न केले होते. पण त्यांचा हा संसार फार काळ टिकला नाही. सतत होणाऱ्या भांडणामुळे त्यांनी घटस्फोट घेतला. 

  • आत्महत्येचा केला होता विचार...

पी.एन. अरोरापासून विभक्त झाल्यानंतर हेलन आर्थिक अडचणीत आल्या. वैयक्तिक जीवनात आलेल्या वादळामुळे हेलन यांचे करिअर खाली येत गेले. नव्या कलाकारांनी त्यांची जागा घेतली. त्यांना कामही मिळत नव्हते. असे म्हणतात की, हेलन इतक्या कंटाळल्या होत्या, की त्यांनी एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न विचार केला होता.

  • सलीम खानसोबत जुळले नाते...

हेलन यांच्या जीवनात मित्राच्या रूपाने आलेले सलीम खान यांच्यासोबत त्यांचे प्रेम जुळले. 1963 साली एका चित्रपटाच्या सेटवर हेलन यांची ओळख सलीम खान यांच्याशी झाली.  सलीम हेलन यांना आधीपासूनच ओळखत होते, अशात त्यांनी हेलनला आधार दिला. लग्न झालेले असूनही सलीम खान यांनी हेलन यांच्याशी दुसरे लग्न केले.  1981 साली हेलन आणि सलीम यांनी लग्न केले.

  • सलीम खानच्या मुलांना मान्य नव्हते हे नाते...

हेलन यांच्यासोबत लग्न केल्यावर सलीम खान जेव्हा घरी आले तेव्हा सलमान, अरबाज आणि त्यांच्या आई सलमा खान यांनी या नात्याला नाकारले. पण सलीम यांना विश्वास होता, की हेलन एक दिवस त्यांच्या घरात नक्कीच जागा मिळवतील. घडलेही तसेच आणि हेलन यांनी या घरात जागा बनवली. लग्नानंतर हेलन आणि सलीम खान यांना एकही अपत्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी अर्पिताला दत्तक घेतले.

  • सलीम खान यांच्या मुलांच्या आई झाल्या हेलन...

सलीम खान यांनी आपल्या दोन्ही पत्नींना सारखा हक्क दिला. त्यांच्या कुटुंबात कधी कलह निर्माण झाल्याचे कुणाच्याही कानावर पडले नाही. सलीम खान यांची पाचही मुलं हेलन यांच्यावर तितकेच प्रेम करतात जेवढे ते आपल्या आईवर करतात. याच कारणामुळे हेलन सलीम खान यांच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर एकाच घरात राहतात.

बातम्या आणखी आहेत...