आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: आजही आईच्या हातचा मार खातो सलमान खान, वडील सांभाळतात पैशांचा व्यवहार, वाचा 'भाईजान'विषयीच्या इंट्रेस्टिंग गोष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेता सलमान खान आज म्हणजेच 27 डिसेंबर रोजी आपला 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमानच्या प्रोफेशनल आयुष्याविषयी तसे ब-याच जणांना ठाऊक आहे. मात्र त्याच्या खासगी आयुष्याविषयीच्या अनेक गोष्टी त्याच्या चाहत्यांना ठाऊक नाहीयेत. याचे एक उदाहरण म्हणजे, सलमान खान वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही आईच्या हातचा मार खातो. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सलमानच्या आयुष्याशी निगडीत अशाच कही रंजक बाबी सांगत आहोत, ज्या त्याने एकदा मुलाखतीत सांगितल्या होत्या.


आजही खातो आईचा मार-
सलमानने एका मुलाखतीत सांगितले होते, ''बालपणी मी जितका साधा-भोळा होतो, माझे दोन्ही भाऊ अरबाज आणि सोहेल तितकेच खोडकर होते. त्यामुळे आमच्यात काही मस्ती झाली तर त्या भांडणात शेवटी मीच पकडला जात होतो. कारण हे दोघे मम्मी-पापा येण्यापूर्वी धूम ठोकत होते. त्यानंतर माझी चांगलीच धुलाई व्हायची, मम्मी मारायची. आईच्या मारामुळे जास्त फरक नव्हता पडत परंतु वालिद साहेबांचा राग मनाला खूप लागत होता. त्यामुळेच आईचा मार खाल्ला तरी आमचा खोडकरपणा कधीच कमी झाला नाही.''


''एकेदिवशी आम्ही मस्ती करताना सोहेलला दुखापत झाली आणि त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरु झाला. हे पाहून मी आणि अरबाज खूप घाबरलो. जितकी भिती सोहेलला लागलेल्या जखमेची नव्हती, तितकी जास्त भिती आईच्या माराची होती. एकीकडे माझी आणि अरबाजची घाबरगुंडी उडाली होती, तर दुसरीकडे मात्र सोहेलने शक्कल लढवून सांगितले, की खेळता-खेळता त्याला ही जखम झाली. तेव्हा आम्ही वाचलो.''


''आजसुध्दा आईचा तो मार आठवला तर भिती वाटते. असे नाही, की आज आम्ही मोठे झालो म्हणजे, आईने मारणे बंद केले आहे. आजसुध्दा जर आम्ही चुकीचे वागलो तर तिच्याकडून थोबाडीत मिळते. परंतु आईचा मार तेव्हाही चांगला वाटत होता आणि आजही वाटतो.''


भेटवस्तू म्हणून देतो घड्याळ...
सलमान खानबाबत एक गोष्ट सर्वांना ठाऊक आहे, की तो भेट म्हणून घड्याळ देतो. एवढेच नव्हे तर कुणी त्याला घड्याळ मागितली तरी तो नकार देत नाही. यामागे त्याच्या बालपणीची एक गोष्ट संबंधित आहे. सलमानच्या सांगितले होते, बालपणी त्याला घड्याळ घालण्याची खूप आवड होती. एकदा जेव्हा त्याने त्याच्या मित्राला त्याची घड्याळ मागितली तेव्हा त्या मित्राने रोलेक्सची घड्याळ असल्याचे सांगून देण्यास नकार दिला. त्यावेळी सलमानला खूप वाईट वाटले, म्हणून सलमानला वाटते, की त्याच्याप्रमाणे कुणी निराश होऊ नये.

 

नाईलाजाने परिधान करायचा फाटकी जीन्स... 
सलमान खानला फाटलेल्या जीन्सचा ट्रेंड सेट करण्यासाठी ओळखले जाते. त्याच्या सांगण्यानुसार, त्याला नाईलाजाने फाटकी जीन्स परिधान करावी लागायची. मात्र लोकांना त्याला एक ट्रेंड बनवले. याविषयी त्याने एक किस्सादेखील सांगितला होता. सिंधीया शाळेत शिक्षण सुरु असताना त्याच्या आईचा धाकटा भाऊ, त्यांना तो टायगर अंकल म्हणायचा. त्यांनी जर्मनीवरून एक जीन्स पाठवली होती. ती जीन्स त्याने कॉलेजमध्ये असेपर्यंत परिधान केली. नंतर जीन्स खराब झाली आणि फाटली. तरीदेखील सलमान फाटलेली जीन्स परिधान करून कॉलेजला जात होता. त्यावेळी सलमानकडे केवळ दोन किंवा तीनच जीन्स होत्या. म्हणून नाईलाजाने त्याने ती फाटलेली जीन्स परिधान केली होती. मात्र लोकांना ती फॅशन वाटली आणि त्यांनी तो एक  ट्रेंड बनला. 

 

सेटवर आजसुध्दा येते आईच्या हातचे जेवण...
सलमान खान आपल्या आईचा मोठा भक्त आहे. त्यामुळे जेव्हा कधी तो शूटिंगवर असतो तेव्हा त्याला आईच्या हातचे जेवण सेटवर येते. सलमान सांगतो, त्याला आईच्याच हातचे जेवण आवडते.

 

वडिलांकडून लिहिणे आणि आईकडून शिकला पेंटींग... 

सलमान खान केवळ एक अभिनेताच नव्हे तर तो एक लेखक आणि पेंटरसुध्दा आहे. त्याच्या सांगण्यानुसार, निवांत क्षणी तो हे दोनही छंद जोपासतो. सलमानने सांगितले, त्याने वडिलांकडून लिहिणे आणि आईकडून पेंटींगची कला अवगत केली आहे. त्याची आई सलमा त्यांच्यातील पेंटींगचे कौशल्या दाखवत नसल्या तरी त्या एक उत्कृष्ट आर्टिस्ट आहेत. सलमानने एका मुलाखतीत सांगितले होते, की तो प्रत्येक पेंटींग कपाळाच्या खालून काढण्यास सुरु करतो, अर्थातच डोळ्यापासून. कारण कपाळापासून आणि त्याच्या वरील भागापासून मनुष्याला धर्मात बांधले जाते. जसे, कुणी पगडी घातली तर तो शीख कुणी जाळीदार टोपी घातली तर तो मुस्लिम आणि टिळा लावला तर तो हिंदू.

 

वडील सांभाळतात बिझनेस...
सलमान खानच्या सांगण्यानुसार, त्याला बिझनेस सांभाळता येत नाही. म्हणून याची जबाबदारी त्याचे वडील सलीम खान यांच्याकडे आहे. पैशांची देवाण-घेवाणसुध्दा सलीम खानच करतात.

 

कपड्यांबाबत अभिनेत्रींना टोकतो सलमान...
सलमान खान प्रत्येक सिनेमांत शर्टलेस दिसतो. मात्र अभिनेत्रींच्या अंगप्रदर्शाचा मुद्दा येतो तेव्हा मात्र तो त्यांना टोकतो. सलमानला अभिनेत्रींनी अंगप्रदर्शन केलेले अजिबात आवडत नाही. जेव्हा कधी एखादी अभिनेत्री तोडके कपडे परिधान करते तेव्हा तो तिला कपड्यांवरून टोकतो. त्यामुळे अनेक अभिनेत्री सलमानच्या या वागणूकीमुळे घाबरतात. सलमानच्या सांगण्यानुसार, सुष्मिता सेन (बीवी नंबर वन फेम), प्रियांका चोप्रा (मुझसे शादी करोगी) आणि झरीन खान (वीर)सह अभिनेत्रींना त्याने सेटवर टोकले होते. 

 

सिनेमांमध्ये  पसंत नाहीत Kissing सीन...
सलमानला सिनेमांमध्ये Kissing सीन देण्यास मुळीच आवडत नाही. कारण सालमानला वाटते, की कुटुंबीयांसोबत सिनेमा पाहताना असे सीन पाहणे योग्य ठरत नाही. हा त्याचा खासगी अनुभव आहे.

 

स्वत:च्या पेंटींग विकतो सलमान...  

सलमान खान सांगतो, की तो वेळ घालवण्यासाठी पेंटींग करतो. परंतु अनेकदा तो या पेंटींग विकतो. एवढेच नव्हे सिनेमांच्या प्रमोशनवेळी तो आपल्या चाहत्यांना पेंटींग भेट म्हणूनसुध्दा देतो. त्याने सुभाष घेई यांना अशी पेंटींग गिफ्ट केलेली आहे. सलमानच्या सांगण्यानुसार, त्याच्या पेंटींगमधून जे पैसे येतात, ते आपल्या चॅरिटेबल ट्रस्ट बीइंग ह्यूमनमध्ये देतो.

 

स्वतःचा मेल आयडी नाही... 
रिपोर्ट्सनुसार, सलमान खानजवळ त्याचा कुठलाही ईमेल आयडी नाहीये. याचे कारण म्हणजे ईमेलच्या माध्यमातून संवाद साधणे तो अवॉइड करतो. याविषयी त्याला विचारले असता, कधी ईमेल आयडीची गरज भासली नाही, असे तो सांगतो. एखाद्याला काही सांगायचे असल्यास ते तो फोनच्या माध्यमातून संपर्क साधून सांगत असतो. 

 

सलमानच्या नावाने रेस्तराँ... 
मुंबईत सलमान खानच्या एका चाहत्याने एक रेस्तराँ सुरु केले आहे. त्याचे नाव त्याने भाईजान असे ठेवले आहे. या रेस्तराँमध्ये प्रत्येक डिश ही सलामन खानच्या आवडीची आहे. रेस्तराँचे मेनू रेडिसन लंडनचे माजी शेफ तबरेज शेख यांनी तयार केले आहे. रेस्तराँला सलमानच्या वांद्रास्थित घराचा लूक देण्यात आला आहे.  

बातम्या आणखी आहेत...